शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: भाजी विकून ठाण्यातील ज्वेलर्सचं अनोखं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 07:26 IST

CoronaVirus Lockdown News: दुकाने सुरू करण्यासाठी ताेडगा काढण्याची मागणी

ठाणे : प्रशासनाला जाग यावी, यासाठी ठाण्यातील व्यापाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर शुक्रवारी जांभळीनाका परिसरातील ज्वेलर्सनी चक्क बंद दुकानाबाहेर भाजी विकून अनोखे आंदोलन केले. प्रशासनाने यावर तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे, तर ठाणे महापालिकेनेदेखील शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे व्यापारी अधिकच संतप्त झाला आहे. दुकाने बंद ठेवली तर खायचे काय, असा सवाल त्यांनी केला आहे. व्यापाऱ्यांपाठोपाठ गुरुवारी हॉटेल व्यावसायिकांनीदेखील रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यानंतर आता शुक्रवारी ठाण्यातील ज्वेलर्सनी सरकाराला जाग यावी, या उद्देशाने रस्त्यावर उतरून चक्क बंद दुकानांसमोर रस्त्यावर बसून भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केल्याचे दिसून आले. आमच्याही पोटाला भूक आहे, आमच्या घरीदेखील बायका-मुले आहेत, त्यांचे पोट भरण्यासाठी काही ना काही केलेच पाहिजे, शासन अद्याप यावर काहीच तोडगा काढत नाही, त्यामुळेच आम्ही भाजी विकण्याचा मार्ग पत्करला असल्याचे मत यावेळी ज्वेलर्सनी व्यक्त केले.दुकाने उघडण्यासंदर्भात लवकरात लवकर मार्ग काढावा, या उद्देशाने तसेच सरकारला जाग यावी, हा या आंदोलनामागचा हेतू आहे. त्यामुळेच आम्ही भाजी विकण्याचा पर्याय निवडला.- कमलेश जैन, अध्यक्ष, ठाणे ज्वेलर्स असोसिएशन दुकानांवर इतर कर्मचाऱ्यांचेही पोट अवलंबून आहे. त्यांचा पगार हा आम्हाला द्यावाच लागणार आहे. लाईट बिल भरावेच लागणार आहे. परंतु, दुकाने बंद असतील हे सर्व कसे करायचे, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या