Coronavirus, Lockdown News:डॉक्टर, परिचारिकांसाठी आजपासून केडीएमटीची विशेष बस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 00:28 IST2020-05-04T00:27:42+5:302020-05-04T00:28:03+5:30
१७ मेपर्यंत कल्याण आणि डोंबिवलीसाठी प्रत्येकी चार बस धावणार

Coronavirus, Lockdown News:डॉक्टर, परिचारिकांसाठी आजपासून केडीएमटीची विशेष बस
कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आणि अन्य प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी केडीएमटीने २४ बस सोडल्या आहेत. आता केडीएमसी परिक्षेत्रांतर्गत वैद्यकीय सेवेतील डॉक्टर आणि परिचारिकांसाठीही उपक्रमाकडून सोमवारपासून विशेष आठ बस सोडण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाने बसची मागणी केली होती. त्यानुसार १७ मे पर्यंत कल्याणसाठी चार आणि डोंबिवलीसाठी चार बस सकाळी ९ वाजता सोडल्या जाणार आहेत.
सध्या लॉकडाउनमध्ये केडीएमटीचा उपक्रम पूर्णपणे बंद आहे; पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी उपक्रमाने २४ बस दिल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीसह लगतच्या बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ शहरांसह थेट मुंबईतील विक्रोळीपर्यंत या बस संबंधित कर्मचाऱ्यांची ने-आण करत आहेत. दिवसभरात ९० फेºया होतात. दरम्यान, महापालिका क्षेत्रांतर्गत वैद्यकीय सेवा बजावणाºया डॉक्टर आणि परिचारिकांनाही आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात येणे-जाणे सोयीचे व्हावे यासाठी विशेष बस सोडण्यात याव्यात अशी मागणी आरोग्य विभागातर्फे केडीएमटी उपक्रमाकडे करण्यात आली होती. त्याप्रमाणे कल्याण-डोंबिवलीसाठी प्रत्येकी चार अशा आठ बस दिल्या आहेत. सोमवारपासून या बस चालू केल्या जाणार आहेत. या बस केवळ डॉक्टर आणि परिचारिकांसाठी असणार आहेत. वैद्यकीय विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठीही याचा उपयोग होणार आहे. कल्याणातील महात्मा फुले चौक, चिकणघर, अन्सारी चौक, आंबेडकर रोड, मोहना, मांडा, तिसगाव, कोळसेवाडी तर डोंबिवलीतील दत्तनगर, मढवी, शास्त्रीनगर, ठाकूरवाडी, पाटकर, मंजुनाथ, नेतिवली नाका, पंचायत बावडी येथील आरोग्य केंद्रावर जाण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिकांना बस दिल्या गेल्या आहेत.
महापालिकेने परिवहनला इंधनासाठी दिला निधी
सध्या केडीएमटीचा उपक्रम अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहे. त्याचा परिणाम दैनंदिन उत्पन्नावर झाला आहे. उपक्रमातील कर्मचाºयांच्या पगारासाठी केडीएमसीकडून अर्थसाहाय्य मिळते तर उपक्रमाच्या एकूण मासिक उत्पन्नातून देखभाल दुरुस्ती आणि बसगाड्यांसाठी लागणारे डिझेल खरेदी केले जाते. पण, सध्या उत्पन्नच बंद असल्याने डिझेल खरेदीही करणे उपक्रमाला शक्य नाही. आजमितीला २४ बस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी दिवसरात्र धावत आहेत. तर सोमवारपासून आठ बस डॉक्टर आणि परिचारिकांसाठी धावणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी धावणाºया बसला लागणाºया इंधनाचा खर्च केडीएमसीकडून उपक्रमाला देण्यात आला आहे.