CoronaVirus News in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 7 नवे रुग्ण, आठ वर्षाच्या मुलीसह नर्सचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 16:53 IST2020-05-01T15:59:33+5:302020-05-01T16:53:30+5:30

CoronaVirus Latest Marathi News in Kalyan-Dombivali: डोंबिवली पूर्वेतील आठ वर्षाच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे.

CoronaVirus Latest Marathi News in Kalyan-Dombivali: 7 new corona patients in Kalyan-Dombivali, including nurse with eight-year-old daughter rkp | CoronaVirus News in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 7 नवे रुग्ण, आठ वर्षाच्या मुलीसह नर्सचा समावेश

CoronaVirus News in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 7 नवे रुग्ण, आठ वर्षाच्या मुलीसह नर्सचा समावेश

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून रुग्णांमध्ये आठ वर्षाच्या मुलीसह नर्सचा समावेश आहे.  त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 169 झाली आहे.

डोंबिवली पूर्वेतील आठ वर्षाच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचबरोबर कल्याण पूर्वेत राहणा-या 44 वर्षीय महिलेला कोरोनाची झाली आहे. ही महिला मुंबईतील शासकीय रुग्णालयात स्टाफ नर्स आहे. डोंबिवली पश्चिमेतील 22 वर्षीय तरुणी व 50 वर्षीय महिला, डोंबिवली पूर्वेत राहणारी 50 वर्षीय महिला, कल्याण पूर्वेतील 31 वर्षीय महिला आणि कल्याण पूर्वेतील 31 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. हे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना झाला आहे.

एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत 51 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. सध्या 115 रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: CoronaVirus Latest Marathi News in Kalyan-Dombivali: 7 new corona patients in Kalyan-Dombivali, including nurse with eight-year-old daughter rkp