coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; शनिवारी अवघ्या ३७१ रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 21:15 IST2021-01-09T21:14:41+5:302021-01-09T21:15:32+5:30
coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यात अन्य काही दिवसांच्या कालावधीच्या तुलनेत शनिवारी रुग्ण संख्या घटली आहे गेल्या २४ तासात कोरोनाचे ३७१ रुग्ण आढळले आहेत.

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; शनिवारी अवघ्या ३७१ रुग्णांची नोंद
ठाणे - जिल्ह्यात अन्य काही दिवसांच्या कालावधीच्या तुलनेत शनिवारी रुग्ण संख्या घटली आहे गेल्या २४ तासात कोरोनाचे ३७१ रुग्ण आढळले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ४६ हजार ७०२ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार २१ झाली आहे.
ठाणे शहरात १२९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५६ हजार ५१९ झाली आहे. शहरात तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३२६ झाली. कल्याण - डोंबिवलीत ७९ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू आहे. आता ५७ हजार ३८० रुग्ण बाधीत असून एक हजार ११६ मृत्यूची नोंंद आहे.
उल्हासनगरमध्ये ११ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ४२९ झाली. तर, ३६२ मृतांची संख्या आहे. भिवंडीला एक बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ६३३ असून मृतांची संख्या ३५२ आहे. मीरा भाईंदरमध्ये ३७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या २५ हजार ७६८ असून मृतांची संख्या ७८९ आहे.
अंबरनाथमध्ये १६ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार ३९० असून मृत्यू ३०८ आहेत. बदलापूरमध्ये १२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार २६ झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या ११९ आहे. ग्रामीणमध्ये १० रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १८ हजार ८७९ आणि आतापर्यंत ५८२ मृत्यू झाले आहेत.