शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

Coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 49वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 4:51 PM

महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला असल्याने कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवलीत आज कोरानाचे 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 49 झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला असल्याने कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. त्यातही डोंबिवली पूर्वेला कोरोनाने जास्त जणांना लक्ष्य केले आहे. डोंबिवली पूव्रेत आत्तार्पयत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 25 झाली आहे.नवे रुग्ण वाढत असल्याने त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे ही बाब  प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची ठरली आहे. दर दिवशी नवे रुग्ण आढळून येत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून आखण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचे काही नागरीकांकडून उल्लंघन होत असल्यानेच हा आकडा वाढतो असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.नव्याने आढळून आलेल्या सहा रुग्णापैकी पाच रुग्ण हे डोंबिवली पूव्रेतील आहे. त्यात पाच वर्षाचा मुलगा व तीन महिला आणि एक तरुणाचा समावेश आहे.याशिवाय कल्याण पूव्रेतील 50 वर्षीय गृहस्थाला कोरोना झाला आहे. यापूर्वी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी आठ जणांना उपचाराअंती घरी सोडण्यात आली आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आजमितीस 38 आहे. आत्तार्पयत कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागानुसार रुग्णांची संख्या विचारात घेता डोंबिवली पूर्वेला कोरोनाने जास्त जणांना लक्ष्य केले आहे.महापालिकेने कल्याण डोंबिवली शहरात खाजगी वाहनांना बंदी केली आहे. किराणा मालाची दुकाने, डेअरी, खाद्य पदार्थ यांची दुकाने सकाळी पाच ते दुपारी 2 र्पयत सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने घाऊक बाजार सुरु ठेवला आहे. तसेच फळबाजार, भाजीपाला, अन्नधान्य शेतमाल हा सगळा इतत्र विभागला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने ड्रोन कॅमेरे लावले आहे. रुग्ण आढळलेले विभाग पोलिसानी सील केले आहे. गर्दीवरील नियंत्रण व सोशल डिस्टसिंग पाळले जात नाही. घरात बसाचा नियम पाळता जात नसल्याने रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.चौकट-विभागनुसार रुग्ण संख्याकल्याण पूर्व-9कल्याण पश्चिम-7डोंबिवली पूर्व-25डोंबिवली पश्चिम-7टिटवाळा-1-------------एकूण-49

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस