coronavirus: Ambernathkar's fight for water along the corona | coronavirus : अंबरनाथवासीयांचा कोरोनासह पाण्यासाठीही लढा

coronavirus : अंबरनाथवासीयांचा कोरोनासह पाण्यासाठीही लढा

अंबरनाथ: करणाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झालेली असताना लाखो नागरिक या कोरीनाशी लढा देत आहे. मात्र अंबरनाथ मध्ये नागरिकांना कोरीना सह पाण्यासाठीही लढा द्यावा लागत आहे .पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील  यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीचा वॉल खोलून शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. सर्व जबाबदारी अधिकार्‍यांची असतानाही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून हे काम करण्याची वेळ आली.

संचार बंदीमुळे सर्वच नागरिक घरात बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे किमान घरातील वीज पुरवठा आणि पाणीपुरवठा सुरळीत राहावा एवढी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र गेल्या पाच दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे . पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाला सक्षम अधिकारी नसल्याने नागरिकांनी जाब विचारावा कोणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाण्याचे वितरण करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे तेच अधिकारी जागेवर नसल्याने याप्रकरणाची दखल आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी घेतली. तात्काळ शहरातील राजकीय पक्षांच्या अध्यक्ष सोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. तोरणा वसतिगृहात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप नाना पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सदाशिव पाटील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह ही बैठक पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी अपुरा पाणीपुरवठा आणि एमआयडीसीकडून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा या दोन महत्त्वाच्या समस्या बैठकीत उपस्थित केल्या. अंबरनाथ शहरासाठी 5 दशलक्ष लिटर पाणी मंजूर झालेल्या असतानादेखील लघुपाटबंधारे विभाग ते पाणी उचलण्यासाठी एमआयडीसीला आदेश नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. अखेर आमदार किणीकर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कायदा हातात घेण्याची तयारी देखील या बैठकीत दर्शविण्यात आली. अधिकारी कागदी आदेशांवर अवलंबून असल्याने त्या आदेशाची वाट न पाहता शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार कीनिकर, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी थेट एमआयडीसीच्या जलवाहिनी कडे धाव घेतली.

अंबरनाथ फॉरेस्ट नाका वर एमआयडीसीची लाईन ही जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला जोडण्यात आली आहे. त्या ठिकाणचा वॉल खोलून एमआयडीसीचे पाणी थेट अंबरनाथ साठी सोडण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत े काम अधिकार्‍यांनी करणे बंधनकारक होते, ते काम शहरातील राजकीय पक्षांनी आणि आमदारांनी एकत्र येऊन केले आहे. फॉरेस्ट नाका येथील वॉल सोडल्यानंतर लागलीच भेंडी पाडा येथील जलकुंभावर पाणी भरण्यासाठी वॉल खोलण्यात आले.  अशा प्रकारची यंत्रणा अधिकाऱ्यांनी दररोज राबवले नाही तर आम्ही स्वतः ही यंत्रणा चालू असे डॉक्टर किनिकर यांनी स्पष्ट केले.

 एमायडीसी मधील सर्व कंपन्या हे बंद असल्याने त्याठिकाणी जाणारे पाणी हे शहरासाठी देणे गरजेचे आहे असे असतानाही एमायडिसी आर मोठेपणाने हे पाणी अडवत असल्याचा आरोप प्रदीप पाटील यांनी केला आहे

Web Title: coronavirus: Ambernathkar's fight for water along the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.