शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ७५ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 04:23 IST

नव्या १५६६ रुग्णांची वाढ; आरोग्य विभागाची माहिती

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने ७५ जणांचा मृत्यू झाला. तर, एक हजार ५६६ नव्या रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९६ हजार ९६० झाली असून मृतांचा आकडा दोन हजार ७१८ झाला.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २८८ रुग्ण नव्याने आढळल्याने बाधितांची संख्या २१ हजार ८०२ वर पोहोचली आहे. चार जणांच्या मृत्यूने आतापर्यंत मृतांची संख्या ६९२ झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ३०९ रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे आतापर्यंत २२ हजार १५५ रुग्ण बाधित झाले असून मृतांची संख्या ४३१ झाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात १९ बाधित आढळून आले. तर, तब्बल ४० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत येथे बाधितांची संख्या तीन हजार ७५६ झाली असून मृतांची संख्या २५८ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १९९ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद शनिवारी करण्यात आली. अंबरनाथमध्ये ६३ नवे रुग्ण वाढले असून एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या चार हजार १८२ तर, मृतांची १६५ आहे. बदलापूरमध्ये ६७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार १३ झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात १२१ रुग्णांची वाढ तर चार मृत्यू झाले आहेत.वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात शनिवारी २१६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, मात्र त्याच वेळी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार २८७ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे १२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजवर पालिका हद्दीतील १० हजार ८३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात सात रुग्णांनी आपले प्राण गमावले. यात वसई-१, विरार-२ आणि नालासोपारामधील४ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आजवर जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या २७७ झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात आढळलेल्या २१६ रुग्णांमध्ये वसई-७३, वसई-विरार-४, नायगाव-४, नालासोपारा-७० आणि विरार-६५ रुग्णांचा समावेश आहे.नवी मुंबईमध्ये ४५५ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४५५ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या १८,१४९ झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने चाचण्याची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत ३६,४४३ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या असून ३२,२२८ अँटिजेन चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५२१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत तब्बल १४,०७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ४६१ झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या