Coronavirus: 720 corona patients found in Thane district; Four people died | Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७२० रुग्ण सापडले; चार जणांचा मृत्यू

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७२० रुग्ण सापडले; चार जणांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ७२० रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख ६७ हजार ६२० बाधितांची नोंद झाली. दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २९० झाली.  
 
 ठाणे शहरात १८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६३ हजार ७१ झाली. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३९१ नोंदवली . कल्याण - डोंबिवलीत २४४ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यू नाही. आता ६३ हजार ९६६ रुग्ण बाधीत असून एक हजार २०५ मृत्यूची नोंंद झाली आहे.  

उल्हासनगरला २० रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९२६ झाली. तर, ३७२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधीत असून मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८१३ असून मृतांची संख्या.३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ७१ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २७ हजार ३२७ असून मृतांची संख्या ८०४ झाली. 

अंबरनाथमध्ये १९ रुग्ण आढळल्याने आता बाधीत आठ हजार ८८९ असून एकही मृत्यू नाही. येथील मृत्यूची संख्या ३१५ झाले आहेत. बदलापूरमध्ये २५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार ४२  झाले आहेत. या शहरात मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या १२७ कायम आहे. ग्रामीणमध्ये १२ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले. आता बाधीत १९ हजार ६३९ तर आतापर्यंत ५९७ मृत्यू झाले आहेत.

Web Title: Coronavirus: 720 corona patients found in Thane district; Four people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.