Coronavirus : ठाण्यात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण वाढले; आकडा 14 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 10:12 AM2020-03-26T10:12:29+5:302020-03-26T10:26:56+5:30

Coronavirus : केडीएमसी आणि नवी मुंबईतील रुग्णांची संख्या प्रत्येकी पाच झाली आहे.

Coronavirus 3 more Corona patients in Thane total case 14 SSS | Coronavirus : ठाण्यात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण वाढले; आकडा 14 वर

Coronavirus : ठाण्यात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण वाढले; आकडा 14 वर

Next

ठाणे - ठाणे जिल्ह्यात बुधवारी आणखी तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. ते रुग्ण ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे ग्रामीण या कार्यक्षेत्रातील असल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ही 14 झाली आहे. मंगळवारी केडीएमसीमध्ये एक रुग्ण समोर आला होता. केडीएमसी आणि नवी मुंबईतील रुग्णांची संख्या प्रत्येकी पाच झाली असून नवी मुंबईत आलेल्या एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 मंगळवारी 599 नवीन संशयित रुग्णांची भर पडली होती. तर बुधवारी 573 नवीन रुग्ण पुढे आले असून यामध्ये ठाण्यातील 243, नवी मुंबईतील -118 तसेच मिराभाईंदर -130, केडीएमसी 39, उल्हासनगर 14, ठाणे जिल्हा ग्रामीण-14, अंबरनाथ-8, भिवंडीत-5 तसेच सर्वात कमी संशयित रुग्ण कुळगाव- बदलापूर - 2 रुग्ण आहेत.

 ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 3123 संशयित नागरिक असून त्यामध्ये सर्वाधिक 1594 जण ठामपा कार्यक्षेत्रातील आहेत. त्यापाठोपाठ नवी मुंबई - 559 ,केडीएमसी - 231, मीराभाईंदर-295, उल्हासनगर 138, कुळगाव-बदलापूर-100, ग्रामीण - 109, अंबरनाथ - 54, भिवंडी - 43 जण आहेत. त्यातील 190 जण 14 दिवसांच्या निगराणीनंतर घरी परतले आहेत. तर,79 पर्यटकांमध्ये लक्षणे आढळून आल्याने त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

ठामपा येथे पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर कल्याण, उल्हासनगर आणि नवी मुंबई येथे रुग्ण निष्पन्न झाले होते. सद्यस्थितीत ठामपा – 2, केडीएमसी आणि नवीमुंबईत प्रत्येकी 5, उल्हासनगर-1 आणि ग्रामीण-1 असे एकूण 1 कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 14 वर पोहोचला आहे.  

 परदेशी नागरिकाचा मृत्यू 

 नवी मुंबईतील पाच बाधित रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. हा बाधित रुग्ण फिलिपाईन्स येथील परदेशी असून नवीमुंबईत धार्मिक कामानिमित्त आला होता. अशी माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी दिली. 

 

Web Title: Coronavirus 3 more Corona patients in Thane total case 14 SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.