शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रविवारी सापडले १८७६ नवे रुग्ण; ४७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 6:18 AM

शनिवारप्रमाणे रविवारीही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४८२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८६ तर मृतांची १४० इतकी झाली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात रविवारी दिवसभरात बाधितांची संख्या एक हजार ८७६ तर ४७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२ हजार ६१८ तर मृतांची एक हजार २५२ झाली आहे.शनिवारप्रमाणे रविवारीही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४८२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८६ तर मृतांची १४० इतकी झाली. ठाणे महापालिका हद्दीत ३७३ बाधितांसह १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या १० हजार ७३१ तर मृतांची ४०२ वर गेली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ३०३ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या चार हजार ३१४ तर मृतांची संख्या १६२ इतकी झाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात ६९ बाधीतांसह एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ३१९ वर तर मृतांची संख्या १२0 वर पोहोचली. उल्हासनगर २५१ रु ग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८१० तर मृतांची ५३ झाली आहे.नवी मुंबईत मृतांचा आकडा अडीचशेच्या घरातनवी मुंबई: शहरात कोरोना रूग्णांच्या वाढीचा आलेख खाली येताना दिसत नाही. विशेषत: मृतांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. नवी मुंबईत आतापर्यंत २४४ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेसमोर मृतांचा दर कमी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नवी मुंबईत आतापर्यंत ७,७९३ कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. यापैकी ४,४३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ३,११६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी १९१ नवीन रूग्णांची भर पडली आहे. तर १६७ रूग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. कोपरखैरणे विभागातून सर्वाधिक म्हणजेच तब्बल ५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. त्यापाठोपाठ नेरूळ विभागात बरे झालेल्या रूग्णांची संख्या ३१ इतकी आहे.वसई-विरारमध्ये सहा हजारांचा टप्पा पारवसई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये रविवारी दिवसभरात २११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने सहा हजारांचा टप्पा पार झाला असून एकूण रुग्णांची संख्या ६१७० झाली आहे. दरम्यान, १४२ जणांनी या जीवघेण्या आजारावर दिवसभरात मात केली आहे.वसई-विरारमध्ये रविवारी आढळलेल्या २११ रुग्णांमुळे सहा हजारचा टप्पा पार झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र त्याच वेळी दिवसभरात १४२ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २८१० झाली आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ठरली.रायगडमध्ये दिवसभरात २६२ कोरोनाबाधितअलिबाग : जिल्ह्यात रविवारी ५ जुलै रोजी २६२ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ५१८१ वर पोहोचली आहे. त्यापैकी २९०५ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रविवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १४५, पनवेल ग्रामीणमध्ये ३९, उरण २३, अलिबाग ६, कूूर्जत ६, पेण ९, महाड २, खालापूर १०, माणगाव ४, रोहा १०, श्रीवर्धन ७, सुधागड १ असे एकूण २६२ कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आले. दिवसभरात पनवेल मनपा ४८, पनवेल ग्रामीण ३९, खालापूर ३, कर्जत १६, पेण १३, अलिबाग १०, माणगाव २ असे १३१ रु ग्ण उपचारानंतर बरे झाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे