CoronaVirus: अ‍ॅण्टीजेन टेस्टसाठी घेणार १० हजार कीट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 01:04 AM2020-06-26T01:04:25+5:302020-06-26T01:17:28+5:30

या टेस्टसाठी लागणारे १० हजार कीट पहिल्या टप्प्यात खरेदी करणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

CoronaVirus: 10,000 insects will be taken for antigen test | CoronaVirus: अ‍ॅण्टीजेन टेस्टसाठी घेणार १० हजार कीट

CoronaVirus: अ‍ॅण्टीजेन टेस्टसाठी घेणार १० हजार कीट

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील हायरिस्क कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने अ‍ॅण्टीजेन टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टसाठी लागणारे १० हजार कीट पहिल्या टप्प्यात खरेदी करणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. अ‍ॅण्टीजेन टेस्टद्वारे संबंधितांना कोरोना झाला आहे की नाही, याचे निदान होऊ शकते. या टेस्टचा उपयोग महापालिकेतील हायरिस्क कोरोना स्पॉट व कंटेनमेंट झोनमधील तापसदृश लक्षणे असलेली व्यक्ती, हायरिस्क व्यक्तींच्या संपर्कात असलेले परंतु, लक्षणे नसलेले व्यक्ती व हृदयविकार, यकृत, फुप्फुस, मूत्रपिंड, मधुमेह, रक्तदाब आदी विकार असलेले रुग्ण, केमोथेरपी उपचार सुरू असलेल्या कॅन्सरग्रस्तांसाठी केला जाणार आहे. तसेच एचआयव्हीबाधित, अवयवप्रत्यारोपण, वृद्ध, गरोदर महिलांची टेस्ट केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतील.
अ‍ॅण्टीजेन टेस्टचा रिपोर्ट ४५ मिनिटांत उपलब्ध होतो. रिपोर्ट हाती येताच उपचार सुरू करणे शक्य होईल. अ‍ॅण्टीजेन टेस्टला आयसीएमआरने मान्यता दिली असली, तरी या टेस्टसाठी लागणारे कीटपुरवठा करणारी कंपनी एकच आहे. त्यामुळे प्रत्येक महापालिकेने हे कीट खरेदी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या आरोग्य विभागातून दिले गेले आहेत.
दरम्यान, कोरोना टेस्टसंदर्भात भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेणारे दौरे सुरू आहेत. त्यांच्या दौºयापाठोपाठ कीट खरेदीचा निर्णय घेतला गेल्याने सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात ही लॅब सुरू होईल, असे सांगितले होते. परंतु, चौथा आठवडा सुरू झाला तरी लॅब सुरू झालेली नाही. आणखी १० दिवस लॅब सुरू होण्यास लागणार आहेत. या लॅबसाठी आयसीएमआरकडून मान्यता लागते. ती मिळविण्यात वेळ गेल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
>लॅबला लागला विलंब
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या चार हजारांवर आहे. दिवसाला सरासरी कोरोनाचे नवे २०० रुग्ण आढळून येत आहेत.
महापालिकेकडून कोरोनाच्या चाचण्या केल्या जातात. मात्र, त्याचे अहवाल मुंबईतील रुग्णालयाकडून येण्यास विलंब होतो. त्यामुळे महापालिकेने कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे कोरोना टेस्ट लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: CoronaVirus: 10,000 insects will be taken for antigen test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.