शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

CoronaVirus News : ठाण्यात कोरोनाचे थैमान सुरूच; गेल्या 24 तासांत 992 बाधितांसह 42 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 10:57 PM

CoronaVirus News : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 21 जून रोजी सर्वाधिक 254 रुग्णांच्या नोंदीसह दोघांच्या मृत्युची नोंद झाली.

ठळक मुद्देठाणे जिल्हयात बाधितांची संख्या 21 हजार 558 तर मृतांची संख्या 726 इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.रविवारी कल्याण डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई महापालिकांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या पार गेली.

ठाणे:  ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी 992 नवे रुग्ण आढळले असून 42 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ठाणे जिल्हयात बाधितांची संख्या 21 हजार 558 तर मृतांची संख्या 726 इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.रविवारी कल्याण डोंबिवली, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई महापालिकांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या पार गेली. बाधितांच्या या वाढत्या संख्येसह  मृतांच्या वाढत्या संख्येमुळेही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 21 जून रोजी सर्वाधिक 254 रुग्णांच्या नोंदीसह दोघांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या तीन हजार 512 तर मृतांची संख्या 73 झाली.  त्यापाठोपाठ भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रतही दिवसेंदिवस ही संख्या वाढली आहे.  याठिकाणी 170 नव्या रुगांची तर पाच जणांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची  एक हजार 45 तर  मृतांची आकडा 71 वर पोहचला आहे.  

ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात रविवारी 164 नवे रुग्ण दाखल झाले.  त्यामुळे येथील बाधितांची संख्या सहा  हजार 296 इतकी झाली. तर 10 जणांच्या मृत्युमुळे मृतांची संख्या 208 वर गेली आहे. नवी मुंबईत 154 नविन रुग्णांची भर पडली. तर सात जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार 841 तर मृतांची संख्या 164 झाली आहे.  त्याचप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये 106 रुग्णांना दिवसभरात लागण झाली. त्यामुळे याठिकाणी दोन हजार 258 इतकी बाधितांची संख्या झाली आहे. 

सहा जणांच्या मृत्युने ही संख्याही 109 वर गेली आहे. उल्हासनगरमध्ये  51  रुग्णांची तर  दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे  एक  हजार 56 तर मृतांची संख्या 32 झाली. अंबरनाथमध्ये 19 नविन रुग्णांची भर पडली असून पाच जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार 139 तर मृतांची संख्या 29 वर गेली आहे. बदलापूरातही नविन 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याने बाधितांची संख्या 552 तर दोघांच्या मृत्युमुळे मृतांची संख्या 13 झाली आहे. तर ठाणे ग्रामीण भागात 49  रुग्णांची तर  तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ग्रामीणमध्ये  बाधितांची संख्या 859 तर  मृतांची संख्या 27 वर गेली आहे.

दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार रविारी 29 मृत्यू झाल्याची नोंद होती. तर पालिकेच्या नोंदीनुसार ही संख्या दहा होती. त्यामुळे याठिकाणी नेमकी मृत्युची संख्या किती याबाबत प्रशासनाकडून नेमके उत्तर मिळू शकले नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे