शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

कोजागिरीवर कोरोनाचे सावट, मागच्या वर्षीच्या तुलनेत दूधविक्रीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:24 IST

कल्याणचा ऐतिहासिक दूध नाका हा दूधविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे पहाटे २ वाजल्यापासून दूधविक्री सुरू होते. दुपारी २, तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूधविक्री होते.

कल्याण : कोजागिरी पौर्णिमा व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शुक्रवारी एकाच दिवशी आले. हा दुग्धशर्करा योग पाहता दुधाची मागणी वाढेल, अशी अपेक्षा शहरातील दूध नाक्यावरील दूधविक्रेत्यांना होती. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे ही अपेक्षा फोल ठरली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत दुधाची विक्री ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे दूध विक्रेत्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.कल्याणचा ऐतिहासिक दूध नाका हा दूधविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे पहाटे २ वाजल्यापासून दूधविक्री सुरू होते. दुपारी २, तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूधविक्री होते. पश्चिमेतील मुस्लीमबहुल वस्तीत जवळपास १०० पेक्षा जास्त गोठे असून, त्यातील ताजे म्हशीचे दूध काढून जवळच असलेल्या दूध नाक्यावर सुटे विकले जाते. विशेष म्हणजे, ताज्या दुधाचा प्रतिलीटर भाव दररोज बदलत असतो. कोजागिरीला किरकोळ विक्रीसह अनेक सोसायट्या येथे दुधाची खरेदी करतात. १० ते ५० लीटरपर्यंत दूध येथून सोसायट्या घेऊन जातात. मग रात्री सोसायटीच्या आवारात अथवा गच्चीवर कोजागरी साजरी केली जाते. प्रत्येकाला चंद्रप्रकाशात गरम दूध दिले जाते.ईद-ए-मिलादला मुस्लीमही दूध खरेदी करतात. त्यामुळे यंदा कोजागिरी व ईद-ए-मिलादला दुधाची जास्त विक्री होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांची होती. शुक्रवारी सकाळी दूध नाक्यावर दुधाचा भाव प्रतिलीटरमागे ६० रुपये होता, तर दुपारी २ वाजता हा भाव १० रुपयांनी वाढून ७० रुपये झाला. दिवसभरात केवळ १० हजार लीटर दुधाची विक्री झाली. मागच्या वर्षी किमान २० हजार लीटर दुधाची विक्री झाली. मागच्या वर्षीच्या दुलनेत यंदा विक्रीत ५० टक्के घट आहे. त्याचा फटका दूधविक्रेत्यांना बसल्याची माहिती दूधविक्रेते मोहम्मद हनी यांनी दिली. कोरोनामुळे दुधाची विक्री कमी झाली आहे.लोक एकत्रित येऊन सण साजरा करू शकत नाही. त्यामुळे जास्तीचे दूध घेऊन ते काय करणार, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला.गरम दुधासोबत चटकदार लाल शेव असलेले फरसाण जास्त विकले जाते. ते केवळ कोजागिरीनिमित्त तयार केले जाते. कोजागिरीला या खास फरसाणची जास्त मागणी असते. हे फरसाण २०० रुपये किलो दराने विकले जाते. त्याला यंदा मागणी कमी असल्याची माहिती एका डेअरीचे मालक प्रकाश हसीजा यांनी दिली. 

सोसायट्यांमध्ये कोजागिरी सुनसुनी  कल्याण : कोरोनामुळे यंदा नागरिकांना कोणतेही सण, उत्सव उत्साहात साजरे करता आलेले नाहीत. दसरा आणि दिवाळीदरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा ही खास मित्र मंडळी, महिला मंडळ जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त असते. परंतु, कोरोनाचे विघ्न  टळले नसल्याने अनेक मंडळे, सोसायट्यांनी शुक्रवारी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली नाही.डोंबिवलीतील रहिवासी वंदना सोनवणे म्हणाल्या की, मागील वेळेस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री वांगणी येथे फिरायला गेलो होताे. रात्रीच्या चंद्रप्रकाशात दूध, खीर पिण्यासाठी खूप मज्जा आली होती. माहुली गडावर जाऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. परंतु, आता कोरोनामुळे महिला मंडळ बाहेर पडत नाही. त्यामुळे प्रत्येकाने घराच्या गच्चीवर जाऊन कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा बेत आखला आहे.घराघरांत खीर-पुरी, श्रीखंड यावर तावकोजागिरीची पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी नैवेद्य म्हणून दिले जाते. शरद ऋतूमधील पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखविण्यात आला. नंतर, नैवेद्य म्हणून ते दूध देण्यात आले. अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणात खीर-पुरी, श्रीखंड-पुरी, तांदळाची पेज, अशी मेजवानी होती. 

टॅग्स :kalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस