CoronaVirus in Thane : उल्हासनगरात धक्कादायक प्रकार, कोरोनामुक्त रुग्ण ४ तासांत पुन्हा रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 21:36 IST2020-05-08T16:49:13+5:302020-05-08T21:36:07+5:30
CoronaVirus in Thane : गुरूवारी रात्री उशिरा कॅम्प नं-४, ३० सेक्शन परिसरात मेडिकल मध्ये काम करणाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले.

CoronaVirus in Thane : उल्हासनगरात धक्कादायक प्रकार, कोरोनामुक्त रुग्ण ४ तासांत पुन्हा रुग्णालयात
उल्हासनगर : कोरोनामुक्त म्हणून टाळ्याच्या गजरात घरी सोडण्यात आलेल्या एका रुग्णाला ४ तासांत कोरोना रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. रुग्ण कल्याण पूर्वेत राहणारा असून मुंबईच्या धर्तीवर पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला घरी पाठविले होते. मात्र दुसरा रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याने गोंधळ उडाल्याचे महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मलवळकर यांचे म्हणणे आहे.
गुरूवारी रात्री उशिरा कॅम्प नं-४, ३० सेक्शन परिसरात मेडिकल मध्ये काम करणाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. त्यामुळे शहरातील रुग्णाची एकूण संख्या १८ झाली. उल्हासनगर कोरोना रुग्णालयात कल्याण पूर्वेतील एका रुग्णांवर उपचार सुरू होते. पहिला अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने, मुंबईच्या धर्तीवर त्याच्यासह संभाजी चौक येथील पोलिसाला टाळ्याच्या गजरात गुरवारी सायंकाळी घरी पाठविले. मात्र ४ तासांत कल्याण पूर्वेतील रुग्णाला उपचारासाठी कोरोना रुग्णालयात आणण्यात आले. त्याचा दुसरा रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने रुग्णालये कर्मचाऱ्यांत गोंधळ उडाला होता.
संभाजी चौकात राहणारा कोरोनामुक्त पोलिसाला घरी क्वारंटाईन केले असून त्यांची पत्नी व तीन मुलांवर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री एका मेडिकल मध्ये काम करणाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला असून त्याच्यावर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कातील कुटुंबासह संबंधितांना क्वारंटाईन केले असून पालिकेने परिसर सील केला. शहरात कोरोनाचे एकूण १८ रुग्ण झाले असून त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला. तर ४ जण कोरोना मुक्त होऊन १३ जनावर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.