शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Corona virus News: ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलच्या आयसीयू बेडसाठी दीड लाख रुपये घेणाऱ्या डॉक्टरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 00:05 IST

महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणामध्ये डॉ. परवेझ शेख (४२, रा. बांद्रा, मुंबई) याला कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.

ठळक मुद्दे डॉक्टरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखलकापूरबावडी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणामध्ये डॉ. परवेझ शेख (४२, रा. बांद्रा, मुंबई) याला कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. शेखसह पाच जणांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार हा गुन्हा २३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास दाखल करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. रुग्णांना आवश्यकतेनुसार आयसीयू आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येतात. तरीही या रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप वसईतील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी केला होता. खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्याने ठाण्यातील या ग्लोबल रुग्णालयात दाखल करून देतो, असे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. समाजमाध्यमांतून या देवाणघेवाणीची चित्रफीत गुरुवारी व्हायरल झाली. त्यानंतर मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे गुरुवारी केली. याची गांभीर्याने दखल घेत महापौर म्हस्के यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने उपायुक्त विश्वनाथ केळकर आणि डॉ. अविनाश माळगावकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये मे.ओमसाई आरोग्य केअर प्रा.लि. या खासगी कंपनीत सल्लागार असलेला डॉ. परवेझ तसेच नाझनीन, अबिद खान, ताज शेख आणि अब्दुल खान अशा पाच जणांचा कथित आरोपींमध्ये समावेश आहे.काय घडला प्रकार?डॉ. परवेझ याच्यासह पाचही आरोपींनी आपसात संगनमत करून दोन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांकडे ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यासाठी २२ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दीड लाखांची मागणी करून ते स्वीकारले. डॉ. परवेझ यांनी नियमबाह्यपणे रुग्णाला याठिकाणी प्रवेश दिला. त्यांचा यात कशा प्रकारे सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय येथे अबीद या रुग्णवाहिका चालकाने रुग्णाच्या मुलाला ग्लोबलसाठी ताज शेखला भेटण्यास सांगितले. त्यानंतर ताज आणि अब्दुल या दोघांकडे ही दीड लाखांची रक्कम रुग्णाच्या नातेवाइकांनी सुपूर्द केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस