Corona Virus News: ठाण्यात दोन दिवसांमध्ये १४ पोलीस कोरोनामुळे बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 22:44 IST2021-04-25T22:42:10+5:302021-04-25T22:44:29+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात गेल्या दोन दिवसांमध्ये १४ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले आहेत. सध्या ६० पोलीस घरात विलगीकरणामध्ये असून, आतापर्यंत दोन हजार २६६ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले आहेत.

आतापर्यंत दोन हजार २६६ पोलिसांना लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात गेल्या दोन दिवसांमध्ये १४ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले आहेत. सध्या ६० पोलीस घरात विलगीकरणामध्ये असून, आतापर्यंत दोन हजार २६६ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले आहेत.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस उपनिरीक्षक, तसेच सात कर्मचारी अशा नऊ जणांना २३ एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली, तर २४ एप्रिल रोजी पाच कर्मचारी बाधित झाले. विशेष म्हणजे, यातील ११ जणांवर घरीच उपचार सुरू असून, उर्वरित तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आतापर्यंत २७० अधिकारी आणि एक हजार ९९६ अशा दोन हजार २६६ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील दोन हजार १५६ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.