Corona Virus 463 corona patients found in Thane district Three people died | Corona Virus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४६३ रुग्ण सापडले; तीन जणांचा मृत्यू 

Corona Virus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४६३ रुग्ण सापडले; तीन जणांचा मृत्यू 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४६३ रुग्ण मंगळवारी सापडले असून तिघांचा  मृत्यूचा झाला. जिल्ह्यात आता दोन लाख ६१ हजार ६६७ रुग्ण संख्या झाले असून सहा हजार २४६ मृतांची नोंद केली आहे. ठाणे शहरात १४२ रुग्ण आढळून आले आहेत. यासह शहरात ६१ हजार ३४४ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या एक हजार ३८२ आहे. कल्याण - डोंबिवलीत १०२ रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू झाला आहे. या शहरात आता ६२ हजार २१७ बाधीत असून एक हजार १९१ मृत्यू झाले आहेत. (Corona Cases In Thane, Maharashtra)

उल्हासनगरमध्ये १२ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. आता या शहरात ११ हजार ७७३ बाधीत नोंदले असून मृत्यू संख्या ३७२ आहे. भिवंडी परिसरात एक रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे सहा हजार ७६० बाधितांची तर, ३५४ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर शहरात ४६ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे.या शहरात २६ हजार ८५६ बाधितांसह ८०२ मृतांची संख्या झालेली आहे. 
 
अंबरनाथला १६ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ७३१ बाधितांसह मृतांची संख्या ३१५ नोंदवण्यात आली आहे. बदलापूरला ३२ रुग्ण आज सापडल्याने नऊ हजार ७५० बाधत नोंदले गेले आहे. येथे एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या १२५ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ७ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १९ हजार ४४३ बाधीत झाले असून ५९२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: Corona Virus 463 corona patients found in Thane district Three people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.