Corona vaccination: उल्हासनगरात लसीकरणास प्रारंभ, लसीचा पहिला मान पौर्णिमा खरात यांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 18:31 IST2021-01-16T18:31:14+5:302021-01-16T18:31:49+5:30
कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचा प्रारंभ आयटीआय कॉलेज येथील आरोग्य सेंटर मध्ये प्रारंभ झाला असून लसीचा पहिला मान आरोग्य सेविका पौर्णिमा खरात यांना मिळाला.

Corona vaccination: उल्हासनगरात लसीकरणास प्रारंभ, लसीचा पहिला मान पौर्णिमा खरात यांना
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचा प्रारंभ आयटीआय कॉलेज येथील आरोग्य सेंटर मध्ये प्रारंभ झाला असून लसीचा पहिला मान आरोग्य सेविका पौर्णिमा खरात यांना मिळाला. प्रत्येक दिवशी १०० जणांना डॉक्टरांच्या निरक्षणाखाली लस देणार असल्याची माहिती वैधकीय अधिकारी डॉ दिलीपकुमार पगारे यांनी दिली.
उल्हासनगरला कोविड-१९ प्रतिबंधकच्या ५ हजार लस आल्या असून नेहरू चौकातील महापालिका आरोग्य केंद्रात लसीचे साठवण करण्यात आल्या आहेत. दररोज १०० जणांना लस देण्याचा मानस महापालिका आरोग्य विभागाने व्यक्त केला. कॅम्प नं-३ येथील आयटीआय कॉलेज मधील आरोग्य केंद्रात लसीचा शुभारंभ महापौर लिलाबाई अशान, आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त मदन सोंडे, सभागृहनेते भरत गंगोत्री, स्थायी समिती सभापती विजय पाटील, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ दिपककुमार पगारे, वैधकीय अधिकारी डॉ राजा रिजवानी, डॉ अनिता सपकाळे यांच्यासह नगरसेवक, पक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आला आहे. ११ वाजून १५ मिनिटांनी लसीचा शुभारंभ करण्यात येणार होती. मात्र शुभारंभ कार्यक्रमात १ तास लांभल्याने लसीकरणास उशीर झाला.
महापालिकेने नोंदणी केलेल्या आरोग्य सेवकांना ऑनलाईन मेसेज पाठवून विशिष्ट वेळेत बोलाविण्यात येते. लसीकरणा पूर्वी त्यांना माहिती देऊन त्यानंतर लस देण्यात येते. लस दिल्यानंतर डॉक्टरांच्या निराक्षणाखाली अर्धा तास त्यांना ठेवल्यानंतर घरी सोडण्यास येते. तसेच त्यांना काही त्रास झाल्यास, त्वरित दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले जाते. शहरातून लसीकरणाची पहिला मान आरोग्य सेविका पौर्णिमा हर्षल खरात यांनी लसीचे स्वागत करून शासनाचे धन्यवाद मानले. लस घेतल्या नंतर कोणताही त्रास झाला नाही. अशी प्रतिक्रिया दिली. तर इतरांच्या मनात धाकधूक असलेतरी, लसी बाबत उत्सुकता होती. सकाळी लसीकरण मोहीम शुभारंभ कार्यक्रम लांबल्याने, लसीकरणास उशिराने सुरवात झाली.
आयुक्त डॉ राजा दयानिधी यांचा उदोउदो
आयटीआय कॉलेज येथील आरोग्य केंद्रात लसीकरण शुभारंभ कार्यक्रमात आयुक्त राजा दयानिधी यांचा सर्वच पक्ष पदाधिकाऱ्यांनी उदोउदो केला. आयुक्त स्वतः डॉक्टर असल्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना वेळेत राबविल्याने, शहरातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांच्या नावात दया असल्याने, त्यांनी शहरवासीयांना दया दाखवून विकास कामांना त्वरित निधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.