शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

ठाणे, कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचा पुन्हा कहर, एकाच दिवसात एक हजार रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:08 AM

कोरोना वाढत असल्याने नागपूर, पुणे यासारख्या शहरांत कडक लॉकडाऊन अमलात आला आहे. मात्र अद्याप ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत तितके कडक निर्बंध लागू केलेले नाहीत.

ठाणे : गेले काही दिवस अनेक निर्बंध लादूनही ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण तसूभरही कमी झाले नाही. उलट वाढता वाढता वाढे अशा पद्धतीने कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. बुधवारी ठाण्यात कोरोनाचे ४९३ नवे रुग्ण आढळले, तर कल्याण-डोंबिवलीत ५९३ नवे रुग्ण आढळले. यामुळे केवळ या तीन शहरांमधील रुग्णांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे.कोरोना वाढत असल्याने नागपूर, पुणे यासारख्या शहरांत कडक लॉकडाऊन अमलात आला आहे. मात्र अद्याप ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत तितके कडक निर्बंध लागू केलेले नाहीत. त्यामुळे अनेक लोक विनामास्क राजरोस फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. कोरोनाचे भय लोकांच्या मनात एक तर कमी झाले आहे किंवा बंधने पाळण्यास लोक विटले आहेत. या तिन्ही शहरांत प्रचंड गर्दी असून, एकाचवेळी हजारो लोक बंधने पायदळी तुडवत असल्यास त्यांच्यावर कारवाई करून नियम न पाळल्यास कारवाई अटळ आहे, असा संदेश ठळकपणे देण्यात संबंधित महापालिकांना यश आलेले नाही. दररोज काही शेकडा लोकांवर कारवाई होते. पण नियम तोडणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत ती संख्या नगण्य आहे.सध्या विवाह सोहळ्यांना या शहरांत ऊत आला आहे. अनेक विवाह सोहळ्यांत निमंत्रितांचे बंधन पाळले जात नाही. गावात होणारी लग्ने, हळदीचे कार्यक्रम, डीजे लावून नाचगाणी याला एकाचवेळी शेकडो लोक हजर असतात. 

भाजप, मनसेचा असहकारमनसेच्या नगरसेवकांनी, नेत्यांनीही मास्क घालणे बंद केले आहे.  भाजप हा राज्यातील विरोधी पक्ष असून, राज्य सरकार कोरोनाची हाताळणी करण्यात व लसीकरण करण्यात कसे अपयशी ठरले आहे, हे सिद्ध करण्याकरिता भाजप झटत आहे. 

केडीएमसीत निर्बंध लागूकल्याण : वाढत्या रुग्णांमुळे कल्याण-डोंबिवलीत आयुक्तांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार लग्न सभारंभाला ५०, तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. होम क्वारंटाइन रुग्णाच्या हातावर शिक्का मारला जाईल.  

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका