कल्याण डोंबिवलीत नवे घर घेणाऱ्यांना दिलासा, ‘झिरो स्टॅम्प ड्युटी’ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 05:18 PM2020-09-07T17:18:41+5:302020-09-07T17:27:23+5:30

अध्यक्ष शितोळे यानी यावेळी माहिती दिली की, राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटीत ३ टक्के सूट दिली आहे. त्या पाठोपाठ एमसीएचआयनेही ३ टक्के सूट दिली आहे.

Consolation for new home buyers in Kalyan Dombivali, 'Zero Stamp Duty' announced | कल्याण डोंबिवलीत नवे घर घेणाऱ्यांना दिलासा, ‘झिरो स्टॅम्प ड्युटी’ची घोषणा

कल्याण डोंबिवलीत नवे घर घेणाऱ्यांना दिलासा, ‘झिरो स्टॅम्प ड्युटी’ची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देअध्यक्ष शितोळे यानी यावेळी माहिती दिली की, राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटीत ३ टक्के सूट दिली आहे. त्या पाठोपाठ एमसीएचआयनेही ३ टक्के सूट दिली आहे.

ठाणे -  कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत नवे खरेदी करणाऱ्यांना एमसीएचआय बिल्डर संघटनेने दिलासा दिला आहे. येथील घर खरेदीसाठी झिरो स्टॅम्प ड्युटी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना तीन ते सहा लाख रुपये फायदा होणार आहे. त्यांची स्टॅम्प ड्युटीसाठीची रक्कम वाचणार आहे. झिरो स्टॅम्प ड्युटीची घोषणा आज एमसीएचआय संघटनेच्या वतीने करण्यात आली. एमसीएचआयने त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रसंगी एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे, पदाधिकारी रवी पाटील, रोहित दिक्षीत, विकास जैन, भरत छेडा आदी उपस्थित होते.

अध्यक्ष शितोळे यानी यावेळी माहिती दिली की, राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटीत ३ टक्के सूट दिली आहे. त्या पाठोपाठ एमसीएचआयनेही ३ टक्के सूट दिली आहे. त्यामुळे ग्राहकाला आत्ता स्टॅम्प ड्युटीच भरावी लागणार नाही. ग्राहक घर खरेदी करताना स्टॅम्प डय़ूचीच्या ओझ्यातून मुक्त झाला आहे. एमसीएचच्या ५० बिल्डर सदस्यांनी स्टॅम्प ड्युटी घेणार नाही असे संघटनेला लिखित स्वरुपात हमी पत्र दिले आहे. अन्य ७५ बिल्डर सदस्यांनी स्टॅम्प डय़ुटीत सूट देण्याचे मान्य केले आहे. या योजनेचा लाभ ग्राहकांना ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत घेता येणार आहे. एमएमआर रिजनमध्ये परवडणारी घरे कल्याण डोंबिवलीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने स्टे-अॅट होमचा संदेश दिला होता. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरीकांच्या मनात स्वत:चे घर असावे अशी भावना जागृत झाली. लॉकडाऊनचा फटका रिअल इस्टेट व्यवसायाला बसला आहे. मात्र, लॉकडाऊननंतर अनलॉक सुरु झाला आहे. या काळात पुन्हा नव्या घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. ही मागणी 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. मागणी वाढल्याने नवे घरे खरेदी करणाऱ्यांना झिरो स्टॅम्प ड्युटी योजनेचा लाभ होणार आहे. रिअल इस्टेट व्यवसायाला लॉक डाऊन काळात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जीएसटी व बँकेच्या हप्ते भरण्यात काही सूट द्यावी अशी मागणी एमसीएचआयतर्फे केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले.
 

Web Title: Consolation for new home buyers in Kalyan Dombivali, 'Zero Stamp Duty' announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.