उल्हासनगरात काँग्रेस सुसाट, इच्छुकांच्या मुलाखती पक्षाच्या १० सूत्री घोषणापत्र जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:30 IST2025-12-16T17:30:08+5:302025-12-16T17:30:42+5:30
उल्हासनगर काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी कॅम्प नं-३, येथील रीजन्सी हॉल मध्ये महापालिका निवडणूकीतील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. शहर प्रभारी नवीन सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण ७८ जागेसाठी मुलाखती घेऊन ६० टक्के जागेसाठी अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत.

उल्हासनगरात काँग्रेस सुसाट, इच्छुकांच्या मुलाखती पक्षाच्या १० सूत्री घोषणापत्र जाहीर
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेच्या एकूण ७८ जागेसाठी शहर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी रिजेन्सी हॉटेल मध्ये मुलाखती घेत, सर्वच जागा लढण्याचे संकेत शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिले. तसेच १० सूत्री घोषणापत्रक यावेळी प्रसिद्ध करून शहरविकासाचा दावा केला.
उल्हासनगर काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी कॅम्प नं-३, येथील रीजन्सी हॉल मध्ये महापालिका निवडणूकीतील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. शहर प्रभारी नवीन सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण ७८ जागेसाठी मुलाखती घेऊन ६० टक्के जागेसाठी अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, गटनेता, माजी नगरसेविका अंजली साळवे, प्रदेश सचिव कुलदीप आईलशिंगानी, पक्षाचे पदाधिकारी किशोर धडके, सुनील बैरानी, नानीक आहुजा, शंकर आहुजा, मनीषा महाकाले आदिजण उपस्थित होते. पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती घेऊन आघाडी घेतली आहे.
काँग्रेस पक्षाचे शहर प्रभारी नवीन सिंग, शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पक्षाचा १० सूत्री निवडणुक घोषणापत्रक प्रसिद्ध करून शहर विकासाचे वचन दिले. स्वच्छ, सुरळीत व नियमित पाणीपुरवठा, दर्जेदार व टिकाऊ रस्ते तसेच २४ तासांत खड्डेमुक्ती, ५०० स्क्वे. फूट क्षेत्रफळाखालील घरांना लावण्यात येणारी घरपट्टीतील दंडात्मक आकारणी रद्द, महापालिकेतील भ्रष्टाचार व ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत काढणे, शहरातील उद्याने व खेळाची मैदाने विकसित करून सर्व राखीव भूखंड सुरक्षित व विकसित करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करणे, शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर देणे, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य व सुरक्षितता यासाठी विशेष योजना राबविणे, महापालिकेअंतर्गत सर्व शाळांच्या सुरळीत कामकाजासाठी व्यवस्था, कचरामुक्त शहर, कचरा डेपो हटवणे व नवीन प्रणालीची अंमलबजावणी, नागरिकांसाठी प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक समित्यांची स्थापना करणे.