सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल कोलशेतचे डी मार्ट सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 20:30 IST2020-09-04T20:30:26+5:302020-09-04T20:30:48+5:30

महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

Coalshet's De Mart seal for non-compliance with social distance | सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल कोलशेतचे डी मार्ट सील

सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल कोलशेतचे डी मार्ट सील

ठाणे : सोशल डिस्टन्सींग नियमाचे पालन न केल्याबद्दल आज ठाणे महानगरपालिकेच्यावतीने कोलशेत ढोकाळी येथील डी मार्ट सील करण्यात आले. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये याबाबतीत महापालिकेच्यावतीने यापूर्वीच मार्गदर्शक सूचना दिल्या असून सोशल डिस्टन्सींग नियमाचे पालन न करणा-यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. या नियमाचे पालन न केल्याबद्दल आणि गर्दीचे नियंत्रण न केल्याबद्दल कोलशेत ढोकाळी येथील डी मार्ट सहाय्यक आयुक्त डाॅ. अनुराधा बाबर यांनी सील केले.

Web Title: Coalshet's De Mart seal for non-compliance with social distance