शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना नगरपरिषदेचे ‘गुड मॉर्निंग’

By admin | Updated: March 12, 2016 01:55 IST

पालघर नगरपरिषदेच्या वतीने १ हजार ४२ लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी कोट्यवधी रु.चा निधी वाटप करूनही नागरिक उघड्यावर शौचाला जात असल्याने पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकांनी उघड्यावर

पालघर : पालघर नगरपरिषदेच्या वतीने १ हजार ४२ लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी कोट्यवधी रु.चा निधी वाटप करूनही नागरिक उघड्यावर शौचाला जात असल्याने पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकांनी उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालघर नगरपालिकेनेही स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. पालघर नगरपालिका क्षेत्रातील शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून स्वच्छ भारत योजनेंतर्गत १ हजार ४२ लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी आतापर्यंत नगरपालिकेने १ कोटी १५ लाख रु.चे अनुदान वाटप केले आहे. मात्र, तरीही काही लोक बांधलेल्या शौचालयांचा वापर न करता उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेतर्फे गुड मॉर्निंग पथके स्थापन करण्यात आली.
शहरातील वीरेंद्रनगर, घोलवीरा, नवल, वेवुर, बाफना कम्पाउंड, इ. भागांतील नागरिक पहाटे उघड्यावर शौचास जात असताना त्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. ज्यांच्याकडे खाजगी शौचालये नसतील, त्यांनी सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा व शौचालयांची गरज असणाऱ्या कुटुंबांनी पालिकेकडे अर्ज करण्याचे आवाहन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले आहे. तसेच यापुढे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर प्रथम दंडात्मक कारवाई म्हणून १०० रु. दंड, त्यानंतर एक हजार रु. दंड व पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)