ठाण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणावर तिघांनी केले चॉपरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 22:23 IST2019-11-07T22:16:55+5:302019-11-07T22:23:27+5:30

मुंबई- ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर नितीन कंपनीजवळ तिघांनी टेम्पोच्या पुढे मोटारसायकल आडवी उभी केली. त्यांच्यातील दोघांनी विकी राठोड याला बाहेर खेचून चॉपरने त्याच्या डोक्यात हल्ला केला. हा प्रकार ५ नोव्हेंबर रोजी घडला.

Chopper attacked by three accused on young men from Thane | ठाण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणावर तिघांनी केले चॉपरने वार

नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देमुंबई- ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर नितीन कंपनीजवळील घटना नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पूर्ववैमनस्यातून विकी कुलचंद राठोड (२१, रा. बाळकुम, ठाणे) या तरुणावर सोनू कांबळे याच्यासह तिघांनी चॉपर आणि लोखंडी रॉडने प्रहार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाळकुम येथील बसथांब्यावर विकी राठोड हा ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी बसला होता. तिथे वागळे इस्टेट, अंबिकानगर येथील तिघेजण जेवणासाठी आले होते. त्यांना त्यावेळी विकीचा चुकून धक्का लागल्याने त्यांच्यापैकी एकाने चॉपर काढून विकीवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने प्रतिकार केल्याने हा वाद मिटला. मात्र, ५ नोव्हेंबर रोजी पुन्हा विकी हा मावस भाऊ पंडित राठोड तसेच सचिन पाटील आणि सचिन कैपाले या मित्रांसह वैतीवाडीतील भंडाऱ्याचा कार्यक्रम संपवून रात्री ११.३० वाजता टेम्पोने घरी जात होता. तेव्हा मुंबई- ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर नितीन कंपनीजवळ तिघांनी त्यांच्या टेम्पोच्या पुढे मोटारसायकल आडवी उभी केली. त्यांच्यातील दोघांनी विकीला बाहेर खेचून चॉपरने डोक्यात वार केले. तर अन्य एकाने लोखंडी रॉडने त्याच्या पायावर आणि कड्याने डोक्यात प्रहार केला. तिघांपैकी सोनू कांबळे याने बांबूने त्याला मारहाण केली. या हल्ल्यात विकी गंभीर जखमी झाला असून त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विकीने ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चौकशी सुरूअसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

Web Title: Chopper attacked by three accused on young men from Thane