मूल नसल्याने बाळाचे अपहरण; दाम्पत्याला अकाेल्यातून पकडले, मुंब्रा पाेलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 09:11 IST2026-01-31T09:10:15+5:302026-01-31T09:11:04+5:30

Crime News: लग्नाला आठ वर्षे उलटूनही मूलबाळ नसल्याने अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला मुंब्रा पाेलिसांनी अटक केली. तब्बल दीड हजाराहून अधिक सीसीटीव्हीची पडताळणी करत पोलिसांनी मोहम्मद मुजीब गुलाब (३१) आणि खैरुणीसा (३०) या दाम्पत्याला पाेलिसांनी सहा दिवसांनी अकाेला जिल्ह्यातील खेटरी गावातून अटक केली.

Child abduction due to lack of children; Couple caught in Akola, Mumbra police crack down on crime | मूल नसल्याने बाळाचे अपहरण; दाम्पत्याला अकाेल्यातून पकडले, मुंब्रा पाेलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

मूल नसल्याने बाळाचे अपहरण; दाम्पत्याला अकाेल्यातून पकडले, मुंब्रा पाेलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

ठाणे - लग्नाला आठ वर्षे उलटूनही मूलबाळ नसल्याने अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला मुंब्रा पाेलिसांनी अटक केली. तब्बल दीड हजाराहून अधिक सीसीटीव्हीची पडताळणी करत पोलिसांनी मोहम्मद मुजीब गुलाब (३१) आणि खैरुणीसा (३०) या दाम्पत्याला पाेलिसांनी सहा दिवसांनी अकाेला जिल्ह्यातील खेटरी गावातून अटक केली.

एक महिला तिच्या दोन मुलींना घेऊन २२ जानेवारीला मुंब्रा, खाडी मशिनकडे जाणारा रस्ता ओलांडत होती. तिची मोठी मुलगी रडत होती. त्यावेळी खैरुणीसा या अनाेळखी महिलेने बाळाला माझ्याकडे द्या,  मी समोरच जात असल्याचे सांगितले. आईने विश्वासाने  मुलीला साेपविल्यावर ती पसार झाली. त्यानंतर आईने मुंब्रा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंदवला. मुंब्रा पोलिसांनी  चार पथकांद्वारे   परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. बुरखाधारी महिला रिक्षात बसून मुंब्रा रेल्वे स्थानकापर्यंत गेल्याचेही आढळले.

बाळाच्या पायातील सॉक्सच्या आधारे घेतला शोध
 -अपहरणकर्त्या महिलेच्या बुरख्याच्या आतून तिच्या हातातील बाळाच्या पायातील सॉक्स बाहेर आला  होता. त्या आधारे मुंब्रा ते वांगणीपर्यंतच्या  सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर, पुन्हा मुंब्रा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत  संशयित महिला धावपळीतच मुलीला  घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरताना व तेथे वाट पाहणारा एक पुरुष दिसला. त्यांच्यासाेबत आणखी एक महिलाही दिसली.
- ती रेल्वे स्थानकातून बाहेर येत, आई नाव लिहिलेल्या रिक्षात बसली. या रिक्षा चालकाचा शाेध घेतल्यानंतर अपहरणाचा छडा लागला. दाम्पत्याच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सुटका करून पालकांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठाण्याचे पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी शुक्रवारी दिली. यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलिस आयुक्त विनायक देशमुख, ठाणे परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष बुरसे, कळवा विभागाच्या साहाय्यक पोलिस आयुक्त प्रिया डमाळे आणि मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे आदींचे पथकही उपस्थित होते.

रिक्षा चालकाच्या मदतीने तपास
खैरुणीसा हिने मुलीच्या अपहरणानंतर एक सरप्राइज असल्याचे सांगून रेल्वे स्थानकात बहिणीला बोलाविले हाेते.  त्याच महिलेचा रिक्षा चालकाच्या मदतीने मुंब्रा पाेलिसांनी शाेध घेतला. तेव्हा  बाळ अकाेल्यात राहणाऱ्या बहिणीकडे असल्याचे तिने सांगताच, पोलिस पथकाने अकोला गाठून दाम्पत्याला अटक केली. तब्बल दीड हजारांहून अधिक सीसीटीव्हींची पडताळणी करत तपास घेण्यात आला. 

Web Title : बांझपन के कारण बच्चे का अपहरण; दंपती गिरफ्तार, मुंब्रा पुलिस ने सुलझाया मामला

Web Summary : बांझ दंपती ने मुंब्रा में तीन महीने के बच्चे का अपहरण किया। सीसीटीवी फुटेज की समीक्षा करते हुए पुलिस ने अकोला में दंपती को गिरफ्तार किया। बच्चे को सुरक्षित बचाया गया और माता-पिता को लौटा दिया गया।

Web Title : Child Kidnapped Due to Infertility; Couple Arrested, Mumbra Police Solve Case

Web Summary : Childless couple kidnapped a three-month-old baby in Mumbra. Police, reviewing CCTV footage, arrested the couple in Akola. The baby was safely rescued and returned to its parents thanks to diligent police work.