मुख्यमंत्र्यांच्या मानधन वाढ आश्वासनामुळे अंगणवाडी सेविकांच्या आशा पल्लवीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 14:34 IST2019-03-04T14:28:36+5:302019-03-04T14:34:49+5:30
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या संयुक्त शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट बुधवारी घेतली. त्यात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी मानधन वाढीचा प्रश्न लवकरच सोडवण्याचे आश्वासन देत सेविकांच्या विविध समस्यां समजून घेण्यासाठी या भेटी दरम्यान चर्चा झाली.

सेविकांचे मानधन वाढ करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शिष्टमंडळाने भेट घेतली
ठाणे : राज्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांचे मानधन अत्यंत तुटपुज्य आहे. त्यात त्वरीत वाढ करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शिष्टमंडळाने भेट घेतली असता मानधन वाढीचा प्रश्न लवकरच सोडवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यामुळे सेविकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या संयुक्त शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट बुधवारी घेतली. त्यात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी मानधन वाढीचा प्रश्न लवकरच सोडवण्याचे आश्वासन देत सेविकांच्या विविध समस्यां समजून घेण्यासाठी या भेटी दरम्यान चर्चा झाली. यावेळी आरोग्य व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारनीलम गो-हे, अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीचे पदाधिकारी एम. एस. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख आणि सुवर्णा तळेकर आदी प्रतिनिधींनी या चर्चेत सहभाग घेतल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राजेश सिंह यांनी लोकमतला सांगितले.