शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे उल्हासनगरात वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 04:14 IST

मेट्रो स्थानकास सिंधूनगर नाव : ‘साई’च्या मागणीने झाला होता वाद

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : उल्हासनगर मेट्रो स्टोशनला सिंधूनगर नाव देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिल्याने जुन्या वादाला तोंड फुटले आहे.

मनसे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधूनगर नावाला विरोध केला आहे. यापूर्वी उल्हासनगरचे सिंधूनगर असे नामांतर करण्यावरून मराठी विरुद्ध सिंधी वाद झाला होता. ऐन निवडणुकीत याच वादाला तोंड फुटल्याचे सेना-मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. उल्हासनगरातील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले होते. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रमेश मुखने यांनी सिंधूनगर नाव देण्याला विरोध केला. यापूर्वी नामांतराचा डाव शिवसेनेने उधळून लावला आहे, असे ते म्हणाले. त्यावेळी शहरात मराठी विरुद्ध सिंधी वाद झाल्याची आठवण मुखने यांनी करून दिली. असा वाद ऐन निवडणुकीच्या काळात होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

साई पक्षाच्या नगरसेवकांनी गेल्या महिन्यात उल्हासनगरचे सिंधूनगर नामकरण करण्याचा प्रस्ताव आणला होता. मात्र त्याला मनसे, शिवसेना तसेच काही सामाजिक संघटना व इतर पक्षांनी विरोध केल्यावर प्रस्ताव मागे घेतला होता. त्याच मागणीची री मुख्यमंत्र्यांनी ओढल्याची टीका मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली. मनसेने मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. यावेळी सचिन कदम, प्रदीप गोडसे, शालिग्राम सोनावणे, संजग घुगे, मैनुद्दीन शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.उल्हासनगरातील मेट्रो स्टेशनला सिंधूनगर नाव देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. मात्र, शहराचे नाव उल्हासनगर हेच राहणार आहे. यापूर्वी सिंधूनगर नावावरून सिंधी विरुद्ध मराठी वाद निर्माण झाला होता. काही लोक ऐन निवडणुकीत विनाकारण तोच वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत.- कुमार आयलानी,शहराध्यक्ष, भाजप

टॅग्स :ulhasnagar-acउल्हासनगर