ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 08:53 IST2018-04-18T08:53:29+5:302018-04-18T08:53:29+5:30

घोडबंदर रोडवर पुन्हा एकदा केमिकल टँकर उलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ऐन कार्यालयीन वेळेत हा केमिकल टँकर उलटल्यानं  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Chemical tanker accident in Thane on Ghodbunder Road, a big obstacle to transport | ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी

ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी

ठाणे- घोडबंदर रोडवर पुन्हा एकदा केमिकल टँकर उलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ऐन कार्यालयीन वेळेत हा केमिकल टँकर उलटल्यानं  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, टँकर बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. हा केमिकल टँकर नाव्हा शेवाहून वाफीला जात होता. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केमिकल टँकर उलटल्यानं  वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. 

(सविस्तर वृत्त लवकरच)

Web Title: Chemical tanker accident in Thane on Ghodbunder Road, a big obstacle to transport