शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoff Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोनेविक्रीचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: March 21, 2016 01:30 IST

अल्प दराने सोनेविक्रीचे आमिष दाखवून अंधेरीतील एका व्यापाऱ्याची सुमारे सात लाखांची फसवणूक करणाऱ्या हमजा नाखुदा (रा. कौसा), प्रदीप राठोड (रा. कळवा) आणि विश्वनाथ पेडणेकर

ठाणे/मुंब्रा : अल्प दराने सोनेविक्रीचे आमिष दाखवून अंधेरीतील एका व्यापाऱ्याची सुमारे सात लाखांची फसवणूक करणाऱ्या हमजा नाखुदा (रा. कौसा), प्रदीप राठोड (रा. कळवा) आणि विश्वनाथ पेडणेकर (रा. विटावा) या तिघांना शीळ-डायघर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
अंधेरीतील रिनो नायर आणि हमजा यांची वाहन खरेदीविक्रीच्या व्यवसायातून दीड वर्षापूर्वी एकमेकांची ओळख झाली. वाहन खरेदीऐवजी मालमत्ताविक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा बेत होता. त्याच वेळी आपला आणखी एक मित्र राठोड याचा झवेरी बाजारात सोनेचांदीच्या दागिन्यांचे दुकान असून ते विकून त्याला गावी जायचे आहे. त्यामुळे बाजारभावापेक्षा अल्प दरात म्हणजे तीन हजार रुपये कमी दराने सोने विकण्याचे आमिष हमजाने नायरला दाखवले. सुरुवातीला तो १०० ग्रॅम सोने घेऊन आला. त्या वेळी नायरकडे पैसेही नव्हते. नंतर, ३ मार्च रोजी दुपारी ३ वा. मुंब्रा-पनवेल रोडवरील हॉटेल विसावा येथे नातेवाईकांकडून जमा केलेले सात लाख रुपये घेऊन नायर आला. त्या वेळी त्याला सात लाखांच्या बदल्यात ३०० ग्रॅम सोने देण्यात येईल, असे हमजाने सांगितले. नायरकडे सात लाख रुपये असले तरी प्रत्यक्षात आपण एक किलो सोने आणल्याचे हमजाने सांगितले. पुरेशी रक्कम नसली तरी सर्वच्या सर्व एक किलो सोने घेऊन जा आणि उर्वरित ७०० ग्रॅम सोन्याचे पैसे नंतर दे, असे नायरला सांगितले. एकाच वेळी सोन्याची इतकी बिस्किटे पाहून नायरचे डोळे दिपले. त्यामुळे त्याने पैसे नसतानाही सर्व सोने बरोबर नेण्याची तयारी दाखवली. नायरकडील सात लाख मिळाल्यावर ही इतकी मोठी रक्कम आमचा एक माणूस घेऊन पुढे जाईल, असे हमजाने त्याला सांगितले.