Central Railway : कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 07:35 IST2018-11-27T07:18:42+5:302018-11-27T07:35:05+5:30

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

Central Railway traffic disrupted due to track fracture between kalyan-vitthalwadi railway station | Central Railway : कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Central Railway : कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठळक मुद्देरेल्वे रुळाला तडे गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतकल्याण-विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडेमध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे उशिरानं

कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या बिघाडामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत-खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.  मंगळवारी (27 नोव्हेंबर) सकाळी 6.15 वाजेदरम्यान ही घटना आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरीही मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे उशिरानं सुरू आहे. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस हा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

सोमवारी संध्याकाळी टिटवाळा-आंबिवली मार्गावर सिग्नल यंत्रणा फेल झाल्याने प्रवाशांना रात्रीपर्यंत फटका बसला असतानाच मंगळवारीही सकाळी मरेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 





 

 

Web Title: Central Railway traffic disrupted due to track fracture between kalyan-vitthalwadi railway station