पोलीस भरतीमध्ये उत्तेजक द्रव्य घेणाऱ्या उमेदवारावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: February 23, 2026 22:06 IST2026-02-23T22:03:00+5:302026-02-23T22:06:22+5:30

चाचणीसाठी २ हजार ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते

case has been registered at Bhayander police station against a candidate who took stimulants in police recruitment. | पोलीस भरतीमध्ये उत्तेजक द्रव्य घेणाऱ्या उमेदवारावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस भरतीमध्ये उत्तेजक द्रव्य घेणाऱ्या उमेदवारावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा भाईंदर: वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भरती वेळी एका उमेदवाराने इंजेक्शनच्या सहाय्याने उत्तेजक द्रव्य घेतल्याने पोलिसांनी त्या उमेदवारावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान वर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस शिपाई भरती २०२४-२५ ची मैदानी चाचणी २० फेब्रुवारी पासून सुरु आहे. सोमवारी (२३ फेब्रुवारी) भरती चाचणीसाठी २ हजार ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. पहाटे ५ च्या सुमारास भरती मैदानामध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येत होता. आलेल्या उमेदवारांची संपुर्ण शरिराची व त्यांच्या बॅगची तपासणी करुन त्यांना शरिरीक चाचणीच्या पुढिल प्रक्रियेसाठी पाठविण्यात येत होते.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पोलिसांचे अंमली पदार्थ तपासणी पथक मैदानामध्ये साध्या वेशात गस्त घालत असतांना १०० मिटर धावण्याच्या ट्रॅक समोरील उमेदवारांकरीता ठेवण्यात आलेल्या बिस्कीट व ग्लुकोज वाटपाच्या तंबुच्या मागील बाजुस आडोशाला उभा राहुन उमेदवार साहिल शंकर अवघडे ( वय २३ वर्षे) रा. जंक्शन बारामती, इंदापुर रोड, पुणे हा त्याच्या एका हाताने दुसऱ्या हाताच्या दंडामध्ये इंजक्शनच्या सहाय्याने उत्तेजक द्रव्य शरिरात सोडतांना व कब्जात बाळगतांना पोलीसांच्या अंमली पदार्थ तपासणी पथकास सापडला.

अवघडे ह्याला पोलिसांनी ताब्यात घेवुन त्याची सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तर गुन्हे शाखेचे अंमलदार सुशांत मुर्गे यांच्या फिर्यादी वरून अवघडे विरुद्ध सरकारतर्फे भाईंदर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन औषधीद्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम, भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघडे याला तात्काळ पोलीस भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे.

भरती प्रक्रिये दरम्यान २० अमलदारांची अमली पदार्थ तपासणी पथके तसेच साध्या वेशातील दोन फिरती पोलीस पथके तैनात केलेली आहेत.  सीसीटीव्ही कॅमेरे व ६९ हँडीकॅम व्हिडीओ कॅमेऱ्यां द्वारे लक्ष ठेवले जात आहे. अंमली पदार्थ, उत्तेजक द्रव्य तसेच तत्सम पदार्थ सेवन करू नये तसेच केल्यास वा जवळ बाळगतांना मिळून आल्यास तात्काळ कठोर कारवाई करुन पोलीस भरती प्रक्रियेतून बाद केले जाणार असल्याचा इशारा अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिला आहे.

Web Title : पुलिस भर्ती में उत्तेजक द्रव्य लेने पर उम्मीदवार के खिलाफ मामला दर्ज।

Web Summary : वसई विरार पुलिस भर्ती में एक उम्मीदवार को उत्तेजक इंजेक्शन लेते हुए पकड़ा गया। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया और उसे अयोग्य घोषित कर दिया गया। भर्ती के दौरान नशीली दवाओं के प्रयोग को रोकने के लिए निगरानी रखी जा रही है।

Web Title : Candidate booked for using performance-enhancing drugs in police recruitment.

Web Summary : A candidate in the Vasai Virar police recruitment was caught using injectable performance-enhancing drugs at the Bhayandar ground. Police arrested him and he was disqualified. Authorities have deployed surveillance to prevent drug use during recruitment.