शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेचे गाजर

By admin | Updated: May 12, 2017 01:36 IST

मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील झोपड्यांच्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने केलेल्या सर्र्वेक्षणानुसार शहरातील

लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील झोपड्यांच्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने केलेल्या सर्र्वेक्षणानुसार शहरातील ४६ पैकी ३ झोपडपट्ट्यांचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाभार्थ्यांच्या यादीत समावेश करून त्यांना पकक्या घरांचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लाभार्थी झोपडपट्ट्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी त्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून येत्या महासभेत मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. तत्कालीन राजीव आवास योजनेंतर्गत मीरा-भार्इंदरमधील झोपड्यांचे अनेक वर्षांपासून सर्र्वेक्षण सुरू केले होते. परंतु, त्या योजनेचे फलित अद्याप प्राप्त झाले नसले, तरी युती सरकारच्या पंतप्रधान आवास योजना मात्र प्रभावशाली असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. त्यानुसार, झोपडपट्ट्यांतून राजकीय श्रेयाची बॅनरबाजी होत आहे. या नवीन योजनेत पक्की घरे मिळण्याच्या आशेपायी झोपडीधारकांनी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी पायपीट केली. योजना लागू होताच पालिकेनेही तात्पुरते शहरातील ४६ झोपडपट्ट्यांचे सर्र्वेक्षण सुरू केले. शहरातील सुमारे २८३ एकर जागेवर वसलेल्या या झोपडपट्ट्यांतील झोपड्यांची एकूण संख्या २७ हजार ५०७ इतकी आहे. त्यापैकी केवळ १७ हजार २६२ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. उर्वरित झोपड्या सर्वेक्षणापासून वंचित ठेवल्या आहेत. यातील बहुतांश झोपडपट्टी केंद्राच्या मीठ विभागाच्या, तर काही राज्य सरकारच्या व पालिकेच्या नागरी सुविधा भूखंडांवर वसल्या आहेत. पालिकेने एकूण ४६ झोपडपट्ट्यांपैकी उत्तनच्या धावगी-डोंगर येथील लालबहादूर शास्त्रीनगर, भार्इंदर पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर व पूर्वेकडील आदर्श इंदिरानगर झोपडपट्ट्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निवड केली आहे.या झोपडपट्ट्याही सरकारी व पालिकेच्या भूखंडावर वसल्या आहेत. त्यातील आंबेडकरनगर व इंदिरानगर या झोपडपट्ट्या सीआरझेडबाधित आहेत. त्यामुळे त्यांचा विकास होणे अवघड असले, तरी त्याची पूर्तता सरकारदप्तरी तसेच पालिकेच्या विकास आराखड्यातील बदलानुसार केली जाईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.