शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

राम मंदिरासाठी लग्नाच्या वऱ्हाडात शिरून केली होती कारसेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 2:38 AM

शिवसैनिकाने जागवल्या आठवणी : मंदिर साकारतेय याचा आनंद

ठाणे : लग्नाच्या वºहाडाचा आसरा घेऊन सर्वप्रथम आम्ही १९८६ साली अयोध्येकडे रवाना झालो होतो. परंतु, १९९२ साली दुसऱ्यांदा गेलो, तेव्हा मात्र खुलेआम शिवसैनिक, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते, सर्व रामभक्तांसोबत एकत्र गेलो होतो. त्यावेळी ‘जय श्रीराम’, ‘गर्व से कहो हम हिंदू है...’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता. आज राम मंदिर प्रत्यक्षात आकारास येतेय, हे पाहून स्व. आनंद दिघे यांचे एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होतोय.

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे, या कल्पनेनी ६६ वर्षीय शेडगे आनंदून गेले आहेत. ज्या राम मंदिराकरिता प्रचंड संघर्ष केला ते स्व. आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अयोध्येला गेलेल्या काही लोकांवर झालेला अमानूष लाठीचार्ज मी जवळून पाहिला होता. दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचा ढाचा पडला, त्याच्या दुसºया दिवशी कारसेवक म्हणून तेथे पोहोचलो. त्यात आठ जण मृत्युमुखी पडले होते, पण ते कोण होते, ते माहीत नाही. तेव्हा मात्र ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या होत्या. ‘गर्व से कहो हम हिंदू है...’ या घोषणांच्या पट्ट्या बनविल्या होत्या. त्या टेंभीनाक्यावर बनविण्यात आल्या होत्या. तेव्हाही आम्ही तीन ते चार दिवस मुक्काम केला होता. आज राम मंदिर होतेय, हे पाहून खूप आनंद तर झालाच, पण दिघे यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसतेय, याचा जास्त आनंद आहे.- शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे

१९९२ साली राममंदिर उभारणीसाठी देशभर झालेल्या आंदोलनात ठाण्याचे नंदकुमार शेडगे सहभागी झाले होते. ते म्हणाले की, १९८६ साली मी रामभक्तांसोबत गेलो होतो, तेव्हा कडक बंदोबस्त होता. तुकड्यातुकड्यांमध्ये आम्ही गेलो होतो. त्यावेळी बंदी असल्याने लग्नाच्या वºहाडातून आम्हाला जावे लागले होते. कारसेवकांच्या आश्रमात तीन दिवस मुक्काम केला होता. जेवण नसल्याने आसपासचे गावकरी उकडलेले चणे आणून देत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRam Mandirराम मंदिरMumbaiमुंबई