शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

२०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर प्लास्टिकपासून का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 6:58 AM

पूर्वी प्लास्टिक नव्हते तेव्हापण आपण जगतच होतो. आपण २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर काल परवा आलेल्या प्लास्टिकपासून आपण देशाला मुक्त का करू शकत नाही

मीरा रोड : पूर्वी प्लास्टिक नव्हते तेव्हापण आपण जगतच होतो. आपण २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर काल परवा आलेल्या प्लास्टिकपासून आपण देशाला मुक्त का करू शकत नाही, असा सवाल करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी प्लास्टिकमुक्त भारताचे आवाहन केले.भार्इंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकची समस्या व संधी यावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले गेले होते. देशातील १६ राज्यांमधून २०३ जणांनी यात सहभाग घेतला होता. रविवारी राज्यपालांच्या उपस्थितीत या चर्चासत्राचा समारोप झाला. उद्योगपती निरंजन हिरानंदानी, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, रेखा महाजन, रवींद्र साठे, उमेश मोरे, रवी पोकरणा, आमदार गीता जैन आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी राज्यपाल म्हणाले की, पूर्वी प्लास्टिक नव्हते, तेव्हा आपण जगतच होतो. पण आज प्लास्टिक जीवनाचा एक भाग बनला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या नव्हत्या तेव्हा काच, धातूच्या बाटल्या होत्याच. मग आता का नाही प्लास्टिकशिवाय जगू शकत? आपल्याला जीवनशैलीत आणि सवयीत बदल करावा लागेल. प्लास्टिकबंदीमुळे रोजगार बुडेल हा विषय बाजूला ठेवा. उद्योगपतींना रोजगार बंद होईल म्हणून काळजी नसते. त्यांना भिती त्यांचा उद्योग बंद होणार, याची असते. तंबाखू बंदीच्या समितीवर असताना तंबाखू उत्पादनापासून बीडी बनवणे आदी कामात लाखो शेतकरी व बीडी मजुरांचा प्रश्न होताच. पण त्याचा लाखावा हिस्साही प्लास्टिकबंदीमुळे बाधित होणार नाही. प्लास्टिक व्यवसायात काम करणाºया कामगारांना दुसरे काम देता येऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकबंदीआड रोजगाराचा विषय बाजूला ठेवा.आपल्याकडे हुशार लोकं आहेत. त्यांनी सरसकट प्लास्टिक बंदी केलेली नसून, केवळ एकदा वापरल्या जाणाºया प्लास्टिक वस्तुंना बंदी केली आहे. गायींना प्लास्टिक खाल्याने खुप त्रास होतो. त्यामुळे प्लास्टिक न वापरण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वदेशी चळवळ झाली तर आपण स्वदेशी वस्तुंकडे वळलो. पंतप्रधानांनी स्वच्छतेचा संदेश दिला, तो अगदी खेड्या पाड्यात पोहचला. घराघरात शौचालयाचा संकल्प केला, तर ८ कोटीपेक्षा जास्त शौचालयं घराघरात बांधली गेली. २०० वर्षांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त होऊ शकतो तर आता आलेल्या प्लास्टिकपासून मुक्त का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी केला.या शिबीरानंतर प्लास्टिक बंदी - वापराबाबत म्हळगी प्रबोधिनी आचारसंहिता बनवणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपल्या जगण्यातून प्लास्टिक बाजूला काढू. हे देशासाठी मोठे योगदान ठरेल, असे सांगत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. प्लास्टिक वापराबाबत दोन महिन्यात आचारसंहिता तयार करुन जनजागृती करणार असल्याचे विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले. तर, प्लास्टिकचा वापर आणि ते नष्ट कसे करतो, हे महत्वाचे आहे, असे हिरानंदानी म्हणाले.‘महाराष्ट्रात राहतो, तर मराठी शिकावे’ठाणे : हिंदी ही राष्ट्रीय भाषा असली तरी महाराष्ट्रात आपण राहतो, तर मराठी बोलायला शिकले पाहिजे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी ठाण्यातील आर. जे. ठाकूर महाविद्यालयात चंद परिवार फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पाचव्या वार्षिक समारंभामध्ये व्यक्त केले. चंद परिवार फाउंडेशन पाच वर्षे खूप चांगल्याप्रकारे समाजोपयोगी कार्य करीत आहे. त्यांनी हे कार्य असेच पुढे चालू ठेवावे. चांगल्या कामाची समाज नेहमी दखल घेत असतोे, असेही ते म्हणाले. या फाउंडेशनतर्फेउत्कृष्ट काम केल्याबदल सुरेश राणाजी, बिरेंद्र नेगी, डॉ. दिनेश चंद आदींना राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर