खोदकामामुळे इमारत झाली धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 03:20 AM2019-04-04T03:20:10+5:302019-04-04T03:20:27+5:30

मीरा रोडची घटना : संरक्षक भिंत कोसळून रस्ता खचला

The building was dangerous due to the excavation | खोदकामामुळे इमारत झाली धोकादायक

खोदकामामुळे इमारत झाली धोकादायक

googlenewsNext

मीरा रोड : मीरा रोडच्या बेव्हर्ली पार्कभागात एका बिल्डरने बांधकामाचा पाया खोदण्यासाठी ५० फूट खोल खोदकाम केल्याने जवळच्या एनजी विकास सोसायटीची संरक्षक भिंत पडून रस्ता खचल्याची घटना मंगळवारी घडली. शहरात सातत्याने असे प्रकार घडत असताना महापालिका मात्र डोळेझाक करत असल्याने राहिवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

एन.जी. विकास इमारतीच्या बाजूला सध्या बांधकाम प्रकल्पासाठी पाया बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण होणार नाही, याची खबरदारी न घेताच सुमारे ५० फूट खोल खोदकाम सुरू केले आहे. खोदकामावेळी मोठ्या प्रमाणात माती खणल्याने मंगळवारी आवाज होऊन एन.जी. विकास इमारतीची कुंपणभिंत खचून कोसळली. इतकेच नव्हे तर इमारतीच्या आतील रस्ता व मोकळी जागाही खचून मोठ्या भेगा पडल्या आहेत. इमारतीची कुंपणभिंत खचून पडल्याने व मोठ्या भेगा गेल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत. ही इमारत २००७ मध्ये बांधली असून जेमतेम ११ वर्षेच झाली आहेत. इमारतीला दोन विंग असून ६४ सदनिका आहेत. इमारतीत मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात.

इमारतीसमोर सुरू झालेल्या दिवसरात्र खोदकामामुळे प्रचंड आवाज होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण यांनासुद्धा आवाजाचा प्रचंड त्रास होत आहे. रहिवाशांनी तक्र ारी करूनही कुणी दाद देत नसून बिल्डरची तळी उचलून धरत आहेत. कुंपण कोसळून तडे गेल्याचे रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक संजय थेराडे, शिक्षण समिती उपसभापती अनिता मुखर्जी आदींना पाचारण केले. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. कुठलीही खबरदारी घेतली नसताना बिल्डरला परवानगी दिली कशी? त्याच्यावर कारवाई का केली नाही? मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत बसणार का? असे अनेक सवाल करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. याआधी रामदेव पार्कजवळ खोदकाम सुरू असताना गटार व रस्ता खचून गेला होता. विनयनगरमध्येही बिल्डरच्या खोदकामावेळी जवळच्या इमारतीची कुंपणभिंत कोसळून लाद्या उखडल्या होत्या.

हाटकेश भागातही अशीच घटना

हाटकेश भागातील ग्रीन वूड या संकुलातील इमारतींना खोदकामामुळे तडे गेले व इमारत खचल्याने रहिवाशांना बाहेर काढावे लागले होते. याच प्रकल्पामुळे ओम महावीर आर्केड या सात मजली इमारतीला हादरे बसून तडे गेल्याची तक्र ार रहिवाशांनी केली होती.
 

Web Title: The building was dangerous due to the excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.