शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांचे धाबे दणाणले

By admin | Updated: October 13, 2016 03:34 IST

आधारवाडी डम्पिंगच्या सपाटीकरणाचा, ते डम्पिंग बंद करण्याचा विषय उच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय हरीत लवादाकडे गेल्याने कल्याण-डोंबिवलीतील बिल्डरांचे धाबे दणाणले

कल्याण : आधारवाडी डम्पिंगच्या सपाटीकरणाचा, ते डम्पिंग बंद करण्याचा विषय उच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय हरीत लवादाकडे गेल्याने कल्याण-डोंबिवलीतील बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. गेली सात वर्षे उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नसताना आता तो लवादाकडे गेल्याने पर्यारणाच्या दृष्टीने पालिकेने हालचाली न केल्यास पुन्हा सर्व बांधकाम प्रकल्प अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बिल्डरांपाठोपाठ या प्रकल्पांत गुंतवणूक करणारे राजकारणी आणि त्यांच्या मंजुरीतून समृद्धीच्या वाटेवर जाणाऱ्या अधिकाऱ्यांचीही कोंडी झाली आहे. हे कमी की काय, अशा स्थितीत नगरसेवकांच्याच पुढाकाराने बायोगॅसचे प्रकल्पही अडचणीत आल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका पुरती कोंडीत सापडली आहे. त्याचा फटका स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना बसण्याची चिन्हे आहेत.घनकचरा व्यवस्थापनाची याचिका सात वर्षानंतर उच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरीत लवादाकडे वर्ग केली आहे. लवादाकडून दिले जाणारे आदेश अत्यंत कठोर व तीव्र स्वरुपाचे असतात. त्याचा अनुभव भोपाळसारख्या महापालिकांनी घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पांना विरोध, पालिकेचे संथ धोरण, अधिकाऱ्यांची चालढकल, पर्यावरणवादी आणि माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यांनी जेरीस आणलेली व्यवस्था यामुळे घनकचरा प्रकल्पासंदर्भात आजवर काय काय केले त्याची सर्व सविस्तर माहिती पालिकेला लवादासमोर मांडावी लागेल. त्यावर लवादाकडून कोणते आदेश दिले जातात, याकडे प्रशासन व याचिककर्त्याचे लक्ष लागले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यावर सुनावणी अपेक्षित आहे.घनकचऱ्याच्या निर्मुलनात पालिकेला यश आलेले नाही. जागरुक नागरिक कौस्तुभ गोखले यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सात वर्षे सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने वारंवार पालिकेस फटकारले. पण डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी दहा वेळा निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. मांडा व बारावे भरावभूमी क्षेत्र सुरु करण्यासाठी मागविण्यात येणाऱ्या निविदांनाही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रकल्पांना होणारा विरोध हे त्याचे मुख्य कारण आहे.आधारवाडी, बारावे आणि मांडा येथील फेरनिविदा उघडण्याची तारीख ७ आॅक्टोबर होती. प्रतिसाद न आल्याने त्याची मुदत १५ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)