शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

तीन कोटी रुपयांना बिल्डरला गंडविले, प्रॉपर्टी एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; ३१ सदनिकाधारकांच्या रकमेचा परस्पर अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:15 IST

Fraud News: एका प्राॅपर्टी एजंटने प्रतीक साळवी (३५) या बांधकाम व्यावसायिकाची तीन काेटी १८ लाखांची फसवणूक केली. त्याने ३१ सदनिकाधारकांच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याने याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाैपाडा पाेलिसांनी रविवारी  दिली.

ठाणे  - एका प्राॅपर्टी एजंटने प्रतीक साळवी (३५) या बांधकाम व्यावसायिकाची तीन काेटी १८ लाखांची फसवणूक केली. त्याने ३१ सदनिकाधारकांच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याने याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाैपाडा पाेलिसांनी रविवारी  दिली.

साळवी यांच्या ‘अटलांटा प्राॅपर्टीज’ आणि ‘अटलांटा ग्रुप’ अशा दाेन  बांधकाम भागीदारी फर्म आहेत. या दाेन्ही फर्मचे ठाण्यातील वागळे इस्टेट याठिकाणी  कार्यालय आहे.  अटलांटा प्राॅपर्टीज या  फर्ममध्ये प्रतीक यांच्यासह त्यांचे वडील प्रमाेद, पृथ्वीराज संघवी, पक्षल संघवी आणि पुष्पराज राठाेड असे पाच भागीदार आहेत. तसेच अटलांटा ग्रुपमध्ये प्रतीक आणि प्रमाेद या पितापुत्रांसह दिव्येश पाटील, साेहम काटे, स्वराज सरवणकर आणि हेमंत बावधनकर असे  सहा भागीदार आहेत.

जानेवारी २०१८ ते २०२४ दरम्यान अटलांटा प्राॅपर्टीज  फर्मने भांडुप येथे इमारत संघवी अटलांटा व अटलांटा ग्रुपने मुलुंड येथे बांधलेली ‘मल्हार गाईड’ या दाेन्ही इमारतीमधील ८४ सदनिका विक्रीतील रकमा या फर्मच्या दाेन्ही मूळ बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी फर्मतर्फे प्राॅपर्टी एजंट माेझम शेख यांच्याकडे साेपविली हाेती.

बनावट सह्या करून आराेपीने रचला कट सदनिका खरेदीदारांना दिल्या जाणाऱ्या पावत्यांचे पावती बुक हे साळवी यांच्या कार्यालयातील दिनेश काटके आणि अर्चना गुप्ता या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात हाेते. शेख याने  त्यांच्याशी संगनमत करून, सदनिका खरेदीदारांकडून रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना दिलेल्या पावत्यांवर काेणीतरी प्रतीक यांच्या बनावट सह्या करून त्या पावत्या सदनिका खरेदीदारांना दिल्या.

शेख याने काटके आणि गुप्ता यांच्याशी संगनमताने तीन काेटी १८ लाखांच्या रकमेचा अपहार केला. त्यामुळे प्राॅपर्टी एजंट शेख याच्यासह काटके आणि  गुप्ता या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, श्रीनगर पाेलिस तपास करत आहेत.

फर्मच्या नावाचा गैरवापर : शेख याने बांधकाम व्यावसायिक कंपन्यांचा विश्वासघात करून दाेन्ही बांधकाम प्रकल्पातील ३६ सदनिका विक्री व्यवहारातील फ्लॅट  खरेदीदारांकडून आलेले तीन काेटी १८ लाख रुपये  दाेन्ही फर्मच्या मूळ बँक खात्यावर जमा करण्याऐवजी शेख याने अटलांटा प्राॅपर्टीज आणि अटलांटा ग्रुप या फर्मच्या नावाचा गैरवापर करून अन्य बँकांमधील खात्यांमध्ये जमा केल्या. त्या पैशांचा स्वत:च्या फायद्यासाठी  अपहारही केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Property agent defrauds builder of ₹3 crore, booked for fraud.

Web Summary : A property agent in Thane cheated a builder, Pratik Salvi, of ₹3.18 crore by misappropriating funds from 31 flat buyers. The agent, Mozam Sheikh, along with accomplices, diverted funds into other accounts, misusing the firm's name. Police are investigating the fraud.
टॅग्स :fraudधोकेबाजीthaneठाणे