जुगार खेळता येत नसल्याने भिवंडीत भावांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:29 IST2025-01-01T13:28:50+5:302025-01-01T13:29:59+5:30
याप्रकरणी तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे...

जुगार खेळता येत नसल्याने भिवंडीत भावांना मारहाण
भिवंडी : मित्राने जुगार खेळता येत नसल्याचे सांगताच दुसऱ्या मित्राने दोन मित्रांच्या संगनमताने मित्रासह त्याच्या भावाला शिवीगाळ करीत शस्त्राने हल्ला करत जखमी केले. ही घटना धामणकर नाका येथे घडली. याप्रकरणी तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इक्बाल व त्याचे अन्य दोन मित्र असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर मुस्तकिम मुसा शेख (४४) व त्याचा भाऊ जाहीद अशी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भावांची नावे आहेत. मुस्तकीम भाऊ जाहीद सोबत निजामपुरा परिसरातील मौलाना आझादनगरमध्ये राहतात. तर आरोपी इक्बाल आणि मुस्तकिम हे एकमेकांचे मित्र आहेत. सोमवारी रात्री साडेबाराच्या वा. मुस्तकीम भाऊ जाहीद सोबत पानमसाला घेत होते. त्यावेळी इक्बाल त्याच्या दोन मित्रांने मुस्तकीमच्या हाताला धरून खेचत त्यास जुगार खेळायला सांगितले. मुस्तकीमने जुगार खेळता येत नाही असे सांगताच इक्बाल आणि त्याच्या मित्रांना या गोष्टीचा राग आल्याने तिघांनी मुस्तकीम, जाहीदला धक्काबुक्की करीत गंभीर जखमी केले.