बहिणीवर चारित्र्यावर संशय घेणाऱ्या भावोजीची मेव्हण्यानेच केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 22:17 IST2019-09-29T22:16:40+5:302019-09-29T22:17:41+5:30

मुंबई अहमदाबाद मार्गावरील वेर्स्टन हॉटेल मागील रस्त्यावर असलेल्या बंद जकात नाक्याच्या स्टॉल जवळ शनिवारी सायंकाळी मृतदेह आढळला होता.

Brother-in-law's murdered of jiju after beating his sister with suspicion in mira road | बहिणीवर चारित्र्यावर संशय घेणाऱ्या भावोजीची मेव्हण्यानेच केली हत्या

बहिणीवर चारित्र्यावर संशय घेणाऱ्या भावोजीची मेव्हण्यानेच केली हत्या

मीरारोड - आपल्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीला मारझोड कारणाराया भावोजीची भावाने मित्रा सोबत मिळुन हत्या केली. काशिमीरा पोलीसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असुन ठाणे न्यायालयाने ३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

मुंबई अहमदाबाद मार्गावरील वेर्स्टन हॉटेल मागील रस्त्यावर असलेल्या बंद जकात नाक्याच्या स्टॉल जवळ शनिवारी सायंकाळी मृतदेह आढळला होता. डोक्यावर दगड मारुन हत्या केल्याने काशिमीरा पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. या प्रकरणी पोलीसांनी राहुल भारत भिसे (२७) रा. संजय यादव चाळ, बाफाणे फाटा, वाकीपाडा, जुचंद्र व त्याचा मित्र दत्ता भुजंग मिसाळ (३०) रा. इनामदार वस्ती, उसळी कांचन, दौंड, पुणे या दोघांना अटक केली.

हत्या झालेल्या मयतचे नाव सागर सुरेंद्र दास (३२) असे असुन तो राहुलचा भावोजी आहे व यमुना नगर भागातच रहात होता. राहुलच्या बहिणीचे सागर शी लग्न झाले होते. परंतु व्यस्री असलेला सागर पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. तीला तो सतत मारझोड करत असे. पतीच्या जाचाला कंटाळुन तीन महिन्या पुर्वीच ती भाऊ राहुलच्या घरी रहायला आली होती. सागर तेथे येऊन देखील पत्नीसह राहुलला शिवीगाळ करत असे.

यातुनच राहुलेने मित्र दत्ता सोबत मिळुन सागरची डोक्यात दगड घालुन हत्या केल्याची माहिती पोलीसांनी दिली. सहाय्यक निरीक्षक दत्तुसाहेब लोंढे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Web Title: Brother-in-law's murdered of jiju after beating his sister with suspicion in mira road