शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भिवंडीत भावाने केली व्यसनाधीन लहान भावाची हत्या, आईने दाखल केला हत्येचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 4:02 PM

रागाच्या भरात व्यसनाधीन भावाला लाकडी दांडक्याने मारून त्याची  हत्या केल्याने पोलिसांनी हत्या करणा-या भावास अटक केली आहे. परंतू दांडक्याने मारणा-या आपल्याच मुलाविरूद्ध तक्रार देण्याची पाळी त्यांच्या आईवर आल्याने परिसरांत दु:ख व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देरागाच्या भरात लहान भावाची हत्याआईने दाखल केला हत्येचा गुन्हाहत्या करणा-या मोठ्या भावाला अटक

भिवंडी : रागाच्या भरात व्यसनाधीन भावाला लाकडी दांडक्याने मारून त्याची  हत्या केल्याने पोलिसांनी हत्या करणा-या भावास अटक केली आहे. परंतू दांडक्याने मारणा-या आपल्याच मुलाविरूद्ध तक्रार देण्याची पाळी त्यांच्या आईवर आल्याने परिसरांत दु:ख व्यक्त केले जात आहे.          आकाश तुकाराम माने(१९)असे मयत तरूण भावाचे नाव असून तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. शहरातील नारपोली-देवजीनगरमध्ये शिवसेना शाखेजवळ तो एकत्र कुटुंबात राहत होता. मयत आकाश नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागून त्याच्या आईवडिलांना त्रास द्यायचा. तसेच व्यसनासाठी परिसरांतील लोकांशी नेहमी भांडण करणे व भुरट्या चो-या करणे अशा तक्रारीने त्याचे आईवडील व भाऊ वैतागले होते. काल रात्री आकाशने आपल्या घरात येऊन आई कौशल्या व वडील तुकाराम माने यांच्याकडे दारूपिण्यासाठी पैश्याची मागणी केली. त्यावरून आाईवडीलांसह त्याचा मोठा भाऊ सुनिल याच्याबरोबर त्याचे जोरदार भांडण झाले. त्यारागाने आकाश हा घराबाहेर पडला आणि रात्री दीड वाजताच्या सुमारास यंत्रमाग कारखान्यातून लाकडी मारदांडा घेऊन घरी आला आणि मोठा भाऊ सुनिल यांस मारदांड्याने मारू लागला. भावाभावांचे हे भांडण सोडविण्यासाठी वडील मध्ये पडले असता घराबाहेरील मोठा दगड घेऊन तो वडिलांच्या अंगावर धावून गेल्याने, सुनीलने त्याच लाकडी दांड्याने आकाशला डोक्यावर, मानेवर व कपाळावर बेदम मारहाण केली. त्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतीने आकाशचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर सुनिल माने हा नारपोली पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला आणि हकीकत सांगितली. मात्र आपला एक मुलगा मयत झाला असताना दुस-या मुलाविरोधात गुन्हा नोंद करण्याची वेळ त्याची आई कौशल्या तुकाराम माने यांच्यावर आली. त्यामुळे परिसरांतील लोकांनी हळहळ व्यक्त केली. पोलिसांना या प्रकरणी सुनिल माने यांस अटक केली आहे.         

टॅग्स :Crimeगुन्हा