पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमधील लिफ्टमध्ये बिघाड; ७ जण अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 16:09 IST2022-07-04T16:08:13+5:302022-07-04T16:09:00+5:30
कोर्ट नाका येथील ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची तळ अधिक सात मजली इमारत आहे. या इमारतीमधील लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर बिघाड झाल्याने अडकली होती.

प्रतिकात्मक फोटो.
ठाणे - ठाणे शहर पोलीस आयुक्तालय असलेल्या इमारतीच्या लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने सात जण दुसऱ्या मजल्यावर अडकले. त्या सात जणांना काही मिनिटांत सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. कोणालाही दुखापत झालेली नसून ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजून १८ मिनिटांच्या सुमारास घडली.
कोर्ट नाका येथील ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची तळ अधिक सात मजली इमारत आहे. या इमारतीमधील लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर बिघाड झाल्याने अडकली होती. यात सात जण अडकले होते. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच लिफ्टमध्ये अडकलेल्या सातही जणांना लिफ्ट मेकॅनिकच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.