भिवंडीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ७५ हजार रुपयांच्या कप सिरपच्या बाटल्या जप्त
By नितीन पंडित | Updated: February 24, 2023 19:02 IST2023-02-24T19:01:16+5:302023-02-24T19:02:06+5:30
भिवंडीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ७५ हजार रुपयांच्या कप सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

भिवंडीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ७५ हजार रुपयांच्या कप सिरपच्या बाटल्या जप्त
भिवंडी: भिवंडी शहरात नशे करता मोठ्या प्रमाणावर कप सिरपचा वापर केला जात असून पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी मादक पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर निजामपुरा पोलिसांनी तलवली नाका काटई येथून दोघाजणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून ७५ हजार रुपये किमतीचा कफ सिरपचा साठा जप्त केलेला आहे.
तलवली नाका येथील तलावाच्या बाजूला अब्दुल सत्तार मोहम्मद इकबाल अंसारी रा.खाडीपार व संदीप कनोजिया रा.चिल्लार फाटा मनोर हे दोघे कफ सिरप या कोडीनयुक्त कफ सिरपच्या औषधांच्या बाटल्या बेकायदेशीरपणे कोणताही परवाना नसताना साठवणूक करून विक्री करीत असल्याचे आढळून आले.निजामपुरा पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ७५ हजार ६०० रुपये किमतीच्या ४५० बॉटल जप्त केल्या असून या दोघां विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.