मोबाईल मागितल्याने डोक्यावर मारली बियरची बाटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 21:33 IST2017-11-13T21:33:42+5:302017-11-13T21:33:54+5:30

ठाणे येथील डॉ. बाबासाहेबर आंबेडकर रोडवरील रहिवाशी कृष्णा गांगुर्डे (२१) यांनी त्यांचा मोबाईल उथळसर येथे राहणा-या मयुर शिंदे यांच्याकडे परत मागितल्याने त्याने त्यांच्या डोक्यावर बियरची बाटली फोडली.

Bottle of beer by asking for a mobile phone | मोबाईल मागितल्याने डोक्यावर मारली बियरची बाटली

मोबाईल मागितल्याने डोक्यावर मारली बियरची बाटली

ठाणे - येथील डॉ. बाबासाहेबर आंबेडकर रोडवरील रहिवाशी कृष्णा गांगुर्डे (२१) यांनी त्यांचा मोबाईल उथळसर येथे राहणा-या मयुर शिंदे यांच्याकडे परत मागितल्याने त्याने त्यांच्या डोक्यावर बियरची बाटली फोडली. याप्रकरणी त्याला सोमवारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कृष्णा यांनी मयुरला त्यांचा मोबाईल दिला होता. तो त्याच्याकडून परत आणण्यासाठी ते ११ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास गेले होते. याचाच राग आल्याने त्याने त्यांना शिवीगाळ करुन हातातील बियरची बाटली त्याच्या डाव्या भुवईवर फोडून जखमी केले. तसेच फुटलेल्या बाटलीने त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावरही हल्ला करुन जखमी केले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला सोमवारी दुपारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
 केवळ मोबाइलची मागणी केल्यानंतर मयूर डोक्यात बाटली फोडल्यामुळे यात नेमकी आणखी काही कारणे आहेत का? या सर्वच बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Bottle of beer by asking for a mobile phone

टॅग्स :Crimeगुन्हा