भिवंडी: इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाच्या झळा सर्वत्र बसू लागल्या आहेत. त्यामुळे इंधन व गॅस टंचाई भासू लागली आहे. भारतात गॅस टंचाई प्रकर्षाने जाणवू लागलेली असल्याने शासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे अनेक भागात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू झाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शिधावाटप कार्यालयाकडून भरारी पथक नेमून कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. अशाच एका कारवाईत भिवंडीत शिधावाटप नियंत्रण विभाग कार्यालयाच्या भरारी पथकाने कारवाई करत ८४ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.
ठाणे उपनियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ कार्यालयाचे उपनियंत्रक प्रशांत काळे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकातील निरीक्षक भगवान खंडेराव यांना भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील एका गोदामात अनधिकृत गॅस सिलेंडरचा साठा केला असल्याची माहिती मिळाली होती.
भरारी पथकातील भिवंडी शिधावाटप अधिकारी रत्नदीप सावंत, गणेश हरणे, मनीष शास्त्री यांनी वळपाडा येथील वर्धमान कंपाऊंड येथे सापळा रचला असता, त्याठिकाणी तीन टेम्पोमधून ८४ गॅस सिलेंडर आढळून आले. ज्यामध्ये भारत गॅस, हिंदुस्तान पेट्रोलियम, गो गॅस, गॅस वन या कंपन्यांचे ४,१२,१७,१९ किलो वजनाचे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर आढळून आले.
५१ रिकामे व ३३ भरलेले सिलेंडर होते. यामध्ये दोन टेम्पो चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियमानुसार नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली जात असल्याची माहिती भरारी पथक प्रमुख भगवान खंडेराव यांनी दिली आहे.
Web Summary : Bhiwandi raid uncovers illegal gas cylinder stock amid shortages. Authorities seized 84 cylinders from various companies and arrested two. A case has been registered at Narpoli police station under the Essential Commodities Act.
Web Summary : भिवंडी में छापेमारी, गैस सिलेंडर की अवैध जमाखोरी उजागर। अधिकारियों ने विभिन्न कंपनियों के 84 सिलेंडर जब्त किए और दो को गिरफ्तार किया। आवश्यक वस्तु अधिनियम के तहत नारपोली पुलिस स्टेशन में मामला दर्ज।