रस्त्यावर सापडलेल्या कसाबच्या साक्षीदाराच्या उपचाराचा खर्च भाजपा उचलणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:00 PM2020-05-11T15:00:46+5:302020-05-11T15:05:47+5:30

नुकतेच मुंबईच्या रस्त्यावर एका दुकानदाराने त्यांना पाहिले आणि माणुसकी दाखवत आसरा दिला होता. 

The BJP will bear the cost of treatment of the witness of 26/11 terror attack case found on road pda | रस्त्यावर सापडलेल्या कसाबच्या साक्षीदाराच्या उपचाराचा खर्च भाजपा उचलणार 

रस्त्यावर सापडलेल्या कसाबच्या साक्षीदाराच्या उपचाराचा खर्च भाजपा उचलणार 

googlenewsNext
ठळक मुद्दे२६/११ मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला क्रुरकर्मा अजमल कसाबच्या गोळीबारातून वाचलेले आणि कसाबविरोधात साक्ष देणारे हरीशचंद्र श्रीवर्धनकर निराधार आयुष्य रस्त्यावर जगत होते. मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील दुकानाचे दुकानदार डिन डिसूजा यांना श्रीवर्धनकर रस्त्यावर बसल्याचे आढळून आले होते.

कल्याण: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस कल्याणमध्ये आले असून दहशतवादी कसाबच्या प्रमुख साक्षीदार हरिशचंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ते कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये भेटीला आले होते. त्यांच्या उपचाराचा खर्च भाजपा पक्ष उचलणार आहे. २६/११ मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला क्रुरकर्मा अजमल कसाबच्या गोळीबारातून वाचलेले आणि कसाबविरोधात साक्ष देणारे हरीशचंद्र श्रीवर्धनकर निराधार आयुष्य रस्त्यावर जगत होते. ६० ओलांडलेले हे वयोवृद्ध आता कुटुंबाला नकोसे झाल्यामुळे श्रीवर्धनकर यांना उतारवयात रस्त्यावर राहण्याची वेळ आली. नुकतेच मुंबईच्या रस्त्यावर एका दुकानदाराने त्यांना पाहिले आणि माणुसकी दाखवत आसरा दिला होता. 
 

मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील दुकानाचे दुकानदार डिन डिसूजा यांना श्रीवर्धनकर रस्त्यावर बसल्याचे आढळून आले होते. माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांना आसरा दिला. अन्न - पाण्याशिवाय श्रीवर्धनकर हे वृद्ध आजोबा रस्त्यावर राहत होते. श्रीवर्धनकर यांना त्यांच्या कुटुंबाने घराबाहेर काढले असून नाईलाजाने त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. 

कसाबची ओळख पटवणारा कुटुंबाला झाला नकोसा, 'तो' रस्त्यावरच पडलेला आढळला

 

खाकीतल्या माणुसकीला सलाम; या फोटोमागची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी!

 

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान श्रीवर्धनकर यांना एक गोळी देखील लागलेली आहे. दहशतवादी कसाबला फाशी देण्यात श्रीवर्धनकर हे मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. डिसुजा यांनी सांगितले की, जेव्हा श्रीवर्धनकर त्यांना रस्त्यावर आढळले तेव्हा त्यांनी त्यांच्या गायकवाड नावाच्या मित्राला याची माहिती दिली. गायकवाड एक एनजीओ चालवतात. एनजीओच्या सदस्यांनी जेव्हा श्रीवर्धनकर यांना जेवण दिले तेव्हा त्यांनी ते खाण्यास नकार दिला होता. नंतर एनजीओने श्रीवर्धनकर यांना आंघोळ घातली आणि त्यांचे वाढलेले केस कापले. गायकवाड यांनी संपूर्ण दिवस शोधमोहिम करुन महालक्ष्मी येथील मुंबई महानगरपालिक कॉलनीतील श्रीवर्धनकर यांच्या भावाला शोधून काढले होते. तेव्हा ते कल्याणला राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात त्यांचा असलेला सहभागाबद्दल माहिती मिळाली. यानंतर गायकवाड यांनी आग्रीपाडा पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलिसांनीही तात्काळ कल्याण येथे राहणाऱ्या मुलाला प्रवासाचा पास देऊन श्रीवर्धनकर यांना कल्याणमध्ये घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र, धक्कादायक म्हणजे गायकवाड यांनी सांगितले की, श्रीवर्धनकर यांच्या कुटुंबाला त्यांना आपल्या घरी ठेवायचे नाही. ते त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्यासंबंधी त्यांच्याकडे विचारणा करत होते. त्यानंतर गायकवाड यांनी देशासाठी महत्त्वाचे कार्य करणाऱ्या श्रीवर्धनकर यांना मदत करावी, असे आवाहन त्यांच्या एनजीओमार्फत केले होते.१ मेला श्रीवर्धनकर यांनी कल्याण जाण्यासाठी मुंबई सोडली.
 

Web Title: The BJP will bear the cost of treatment of the witness of 26/11 terror attack case found on road pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.