शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 6:25 AM

कर्नाटकात भाजपा लोकशाहीचा गळा घोटत आहे. असेच करायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका न घेता स्वत:च मुख्यमंत्री, राज्यपाल नेमून राज्य करावे, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी लगावला.

उल्हासनगर : कर्नाटकात भाजपा लोकशाहीचा गळा घोटत आहे. असेच करायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका न घेता स्वत:च मुख्यमंत्री, राज्यपाल नेमून राज्य करावे, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी लगावला. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका एकत्र घ्या. त्याला आम्ही तयार आहोत. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे आव्हानही त्यांनी दिले.उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद््घाटनानंतर गोल मैदानातील जाहीर सभेत ते बोलत होते. कर्नाटक, गोवा, मेघालय, बिहार आदी राज्यांत भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला. त्यांना काहीही करून त्यांच्याच पक्षाचे सरकार बसवायचे असेल, तर निवडणुकाच घेऊ नका. तुमचा जाहिरात खर्च, भाषण, दौरे यांचा वेळ वाचेल. मोदी विदेश दौरे करायला मोकळे होतील. थेट मुख्यमंत्री आणि राज्यपाल नेमून राज्य करा. निवडणुका आल्या, की मंदिर वहीं बनाऐंगेचा नारा सुरू होईल. आता यांची सत्ता आहे. मग मंदिर बांधायला यांचे हात कोणी बांधलेत? यांनी शेतकऱ्यांची दशा केली, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची वाट लावली. जकातीच्या उत्पन्नाचे स्त्रोत बंद करून पालिकांना भिकारी केले, अशी टीकाही त्यांनी केली.मूठभरांच्या हितासाठी उल्हासनगरचा नवा शहर विकास आराखडा मंजूर झाला असून त्यामुळे तीन लाखांपेक्षा जास्त नागरिक बाधित होणार आहे. असा विनाशी विकास आराखडा रद्द केला जाईल, असे आश्वासन त्यांनी सभेत दिले. तेथील व्यापाºयांचे प्रश्न सोडवले जातील आणि प्रदूषणाच्या प्रश्नावर बंद पडलेले जीन्स कारखाने सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले.उल्हासनगरच्या कामगार रूग्णालयाच्या जागी नवे हॉस्पिटल उभे राहणार असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाची मान्यता खासदार शिंदे यांनी आणल्याचे ठाकरे यांनी सांगितले. परवडणाºया घरांच्या नावाखाली मुंबईतील मीठागरांच्या जमिनी हडपण्यास त्यांनी विरोध केला. सत्तेत असूनही कायम जनतेच्या प्रश्नावर आंदोलन केल्याने शेतकरी, सामन्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाजपाला भाग पाडल्याचा दाखलाही त्यांनी दिला.यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांगडे, आमदार बालाजी किणीकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सिंधी समाजासह इतर समाजातील संताना खास आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणात उल्हासनगरच्या विकास आराखड्याला विरोध असल्याचे जाहीर केले. खासदार शिंदे यांचा कार्य अहवाल यावेळी प्रसिध्द झाला. तसेच त्यांचाय वेबसाईटचे उद्घघाटनही ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.>शिवसैनिकांच्या प्रेमाचे टॉनिकउल्हासनगरातील शिवसैनिकांची प्रचंड गर्दी मला शिवसेनाप्रमुखांसारखे टॉनिक देऊन गेली. त्यामुळे मी तुम्ही आमंत्रित न करताही मी उल्हासनगरात येणार असल्याचे वचन ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा