शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

भाजपा - शिवसेना आमदारांमध्ये चांगलीच जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:13 AM

सरनाईकांच्या प्रभागात मेहतांची कारवाई, शिवसैनिक संतप्त

मीरा रोड : हाटकेश भागातील औद्योगिक वसाहती तोडण्याच्या मुद्यावर भाजप आणि सेनेच्या आमदारांमध्ये सोमवारी जुंपली. शिवसेनेचे आ. प्रतापराव सरनाईक यांच्या प्रभागात भाजपाचे आ. नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने हा वाद उद्भवला. दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने तणाव वाढला होता. यावेळी झालेल्या दगडफेकीने कारवाईसाठी आणलेल्या पोकलेनची काच फुटली. तणाव वाढताच आमदार नरेंद्र मेहता यांनी काढता पाय घेतला आणि पालिकेने कारवाई गुंडाळली.महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी सकाळपासून हाटकेश भागातील औद्योगिक वसाहतीत कारवाई सुरु केली. पालिकेने बळजबरी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरु केल्याचा आरोप उद्योजकांनी आ. सरनाईकांजवळ केला. माझ्या मतदारसंघात दुसरा आमदार सांगेल त्याप्रमाणे वाट्टेल ते कराल तर खपवून घेणार नाही, असे सरनाईक यांनी पालिका अधिकाºयांना बजावले. आ. सरनाईकांचा रोष पाहून शिवसैनिकही संतापले. आ. सरनाईक स्वत: पोकलेनसमोर उभे झाल्यानंतर अधिकाºयांनी कारवाई थांबवली. मात्र त्यामुळे काही वेळ तणाव झाला होता.मारहाण व खोटे आरोप करणे हेच शिवसेनेचे काम आहे. भाजपा विकासाचे काम करते. ठाण्यात मोठ्या प्रमाणात रस्ते तोडले, तर सरनाईक काय बिल्डरांकडून पैसे घेऊन रिक्शावाला ते अरबपती बनले आहेत का ? आ. सरनाईकांनी केलेला प्रकार निंदनीय आहे.- नरेंद्र मेहता, आमदार, भाजपाआ. नरेंद्र मेहता यांना काय आरोप करायचे ते करु देत; मात्र शिवसेना त्यांचे कोणतेही आरोप खपवून घेणार नाही, हे त्यांनी समजून घ्यावे. आ. नरेंद्र मेहता ही काय व्यक्ती आहे ते संपूर्ण शहराला माहीत आहे. ते मी वेगळ््याने सांगण्याची गरज अजिबात नाही.- आ. सरनाईक, आमदार, सेना

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाmira roadमीरा रोड