शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भाजपा, शिवसेना युतीमुळे काँग्रेस पडणार एकाकी? मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 4:23 PM

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना या मित्र पक्षांनी एकत्रित लढणार असल्याची घोषणा केल्याने त्याचा परिणाम मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारणात दिसून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

- राजू काळे   

भाईंदर - येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाशिवसेना या मित्र पक्षांनी एकत्रित लढणार असल्याची घोषणा केल्याने त्याचा परिणाम मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारणात दिसून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकमेकांसमोर विरोधात उभे ठाकलेल्या शिवसेनेने भाजपाच्या सबका साथ, सबका विकासाचे सुत्र अवलंबविण्याची शक्यता बळावल्याने काँग्रेस एकाकी पडणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.

केंद्रासह राज्य सरकारात भाजपासोबत असलेल्या शिवसेनेने येत्या लोकसभा व विधानसभेत एकला चलो ची भूमिका जाहिर केली होती. यूतीसाठी शिवसेना कोणत्याही पक्षाकडे कटोरा घेऊन जाणार नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. तर युती झाले तर ठिक अन्यथा निवडणुकांत शिवसेनेला पटकण्याची भाषा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वापरली होती. या सर्व भूमिका व भाषांना गुंडाळून भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती जाहिर केली. यामुळे २०१७ मधील मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत व तद्नंतर एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या भाजपा व शिवसेनेत आता समझोता होणार असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासूनच दिसू लागले होते. तसे अधिकृत विधान शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात केले सुद्धा. यामुळे तुझे-माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना, असा भाईचारा या दोन पक्षांमध्ये मतदारांना दिसून आला. त्यातच या दोन्ही पक्षांची युती झाल्याचे जाहिर झाल्याने  दोन्ही पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांत अधिकृतपणेच दिलजमाई झाल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.पालिका निवडणुकीत भाजपा एक क्रमांकाचा पक्ष ठरल्याने आपसुकच पालिकेची सत्ता भाजपाच्या हाती आली तर विरोधी पक्षांत शिवसेना वरचढ ठरल्याने हा पक्ष एक क्रमांकाचा विरोधी पक्ष ठरला. शिवसेनेला भाजपाने नेहमी हक्काच्या पदासाठी तसेच आवश्यक दालनासाठी झुलत ठेवून गळचेपी केल्याने स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्यांच राजकीय खुन्नस पैदा झाली होती. तर काही विकासकामे अत्यावश्यक असल्याचा दावा करीत भाजपाकडून ती जाणीपुर्वक शिवसेनेच्या बालेकिल्लयात करण्याचा प्रयत्न केला. त्याला शिवसेनेने विविध माध्यमातून जोरदार विरोध करुन त्या विकासकामांना झुलत ठेवले. जलकुंभ लोकार्पणाचा राडा असो कि शिक्षणासाठी राखीव असलेल्या भूखंडावर बाजार थाटण्याचा प्रकार. शिवसेनेने त्याला रोकठोक उत्तर दिले. युतीनंतर मात्र भाजपाई विकासाच्या मनसुब्याला शिवसेना पाठींबा देणार असल्याची चर्चा शहरात तसेच राजकीय वर्तुळात सूरु झाली आहे. यामुळे दुसय््राा क्रमांकाचा विरोधी पक्ष असलेली काँग्रेस मात्र एकाकी पडणार असल्याचे बोलले जात असल्याने या दोन्ही पक्षांना खय््राा अर्थाने अच्छे दिन येऊन शहराचा विकास सबका साथ या धोरणावर होणार असल्याची उपहासात्मक चर्चा सुरू झाली आहे. 

 

भाजपाने शहराच्या हितासाठी आणलेल्या विषयांना शिवसेना पाठींबा नक्कीच देईल. शहराच्या हितासाठी नसलेले तसेच स्वार्थासाठी असलेल्या विषयांना शिवसेना सभागृहात तसेच सभागृहाबाहेर कायम विरोधच करेल.

- आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना

युतीमुळे भाजपाच्या सबका साथ, सबका विकास धोरणाला शिवसेना सहकार्य करुन स्थानिक पातळीवर सुद्धा युती धर्म पाळेल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेने भाजपाला सहकार्य केल्यास शहराचा विकास सहज गतीशीलच होईल. 

- चंद्रकांत वैती, उपमहापौर

युती धर्म पाळण्यासाठी विरोधी पक्षातील शिवसेनेने भाजपाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस मात्र विरोधकांची भूमिका  कायम राहिल. शहराच्या हितासाठी आम्ही सुद्धा कटीबद्ध असल्याने काँग्रेस कधीच एकाकी पडली नाही व पडणारही नाही. यंदाची युती हि केवळ आगामी निवडणुकांतील अ‍ॅडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुन्हा दोघांत धुसफूस सुरूच राहणार आहे. 

- जुबेर इनामदार, काँग्रेस गटनेता

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv Senaशिवसेना