शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखविणाऱ्या भाजपाचा कामगार सेनेकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 1:43 PM

मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते हे मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप भाजपा आ. नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता यांनी केला आहे

राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते हे मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप भाजपा आ. नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता यांनी केला आहे. मात्र आयुक्त पारदर्शक कारभार करीत असल्याचा दावा करुन त्यांचे समर्थन शिवसेनेच्या मीरा-भार्इंदर कामगार सेनेने केले आहे. यामुळे आयुक्तांच्या पारदर्शक व अपादर्शक कारभारात सेना, भाजपात मात्र चांगलीच जुंपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असुन त्याच्या अनेकदा तक्रारी करुनही आयुक्त त्यावर कोणतीही कार्यवाही करीत नाही. यामुळे त्या बांधकामांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळत आहे. आयुक्त कार्यालयात उपस्थित असतानाही विकासकामांच्या बैठकीसह महासभेला व महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित रहात नाहीत. भ्रष्ट अधिकाय््राांना पाठीशी घालून त्यांना आयुक्तांकडुन अर्थपुर्ण संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप महापौरांनी आयुक्तांवर केला आहे. त्यात अपेक्षित सुधारणा न झाल्यास आजपासुन आपल्यासह उपमहापौर, सभागृह नेता हे पदसिद्ध अधिकारी आपापल्या दालनात तसेच नगरसेवक देखील पालिकेच्या सभांना उपस्थित राहणार नसल्याचा इशारा महापौरांनी पत्रकाद्वारे आयुक्तांना दिला आहे. भाजपाच्या या आरोपांना खोडुन काढीत आयुक्तांनी आपल्या पारदर्शक कारभाराचा खुलासा जाहिर केला. त्यात जी बांधकामे अनधिकृत आहेत त्यावर कारवाई करण्यात आली असुन उर्वरीत बांधकामांवर न्यायालयीन स्थगिती आदेश असल्याचा दावा केला आहे. त्याची सुनावणी १८ ते २४ नोव्हेंबर दरम्यान असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणुन दिले. मात्र १९ पासुन आयुक्तांच्याच आदेशानुसार उर्वरीत काही अनधिकृत बांधकामावर पुन्हा कारवाई करण्यास सुरुवात झाली. मात्र त्या बांधकामांवरील स्थगिती उठली किंवा नाही, हे अद्याप गुलदस्त्यात असुन आयुक्तांनी त्या भ्रष्ट अधिकाय््राांच्या बदल्या देखील केल्या. यामागे भाजपाच्याच इशाय््रााचे परिणाम असल्याचा दावा भाजपाकडुन केला जात आहे. मात्र मीरा-भार्इंदर कामगार सेनेने भाजपाकडुन आयुक्तांच्या अपारदर्शक कार्यक्षमतेवर दाखविलेल्या अविश्वासाचा निषेध व्यक्त केला आहे. तसे समर्थन पत्रच थेट आयुक्तांना दिले आहे. त्यात आयुक्तांनी पालिकेचा पदभार स्विकारल्यानंतर कारभारात गती आल्याचा दावा करण्यात आला आहे. आॅगस्टमध्ये पार पडलेली पालिका सार्वत्रिक निवडणुक आयुक्तांनी यशस्वीपणे पार पाडुन प्रलंबित ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजना मार्गी लावली. रखडलेला भुयारी वाहतुक मार्ग खुला केला. इतर विकासकामांना देखील गती देऊन आयुक्तांनी पारदर्शक कारभारचा प्रत्यय आणूनदिल्याचा दावा कामगार सेनेने केला आहे. दरम्यान महापौरांच्या पत्रावर आयुक्तांऐवजी उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी तो इशारा मागे घेण्याचे आवाहन पत्राद्वारे केले. ते भाजपाने अमान्य केले. याबाबत आ. नरेंद्र मेहता यांनी सांगितले कि, महापौरांच्या पत्राला राजशिष्टाचाराप्रमाणे आयुक्तांनी उत्तर देणे अपेक्षित होते. परंतु, उपायुक्तांनी उत्तर दिल्याने उपायुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या दोन ओळींच्या पत्रावर आम्ही समाधानी नाही. आयुक्तांनीच थांबविलेली तोडक कारवाई पुन्हा सुरुवात झाली. तसेच त्या भ्रष्ट अधिकाय््राांच्या बदल्या केल्या. यामागे भाजपाच्याच इशाय््रााचा परिणाम असुन मात्र काही लोकं आयुक्तांवर व्यक्तीगत निष्ठा दाखवुन आपला स्वार्थ साधुन घेण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. तसेचमीरा-भार्इंदर कामगार सेनेचे सरचिटणीस सुल्तान पटेल म्हणाले कि, आयुक्तांच्या नियंत्रणाखाली पालिका गतीमान कारभार करीत आहे. परंतु, सत्ताधाय््राांच्या स्वार्थी उद्देशाला आयुक्त दाद देत नसल्यानेच महापौर व आमदारांनी त्यांच्या कारभारावर अविश्वास दाखविला आहे. हे अशोभनीय असुन कामगार सेनेचा मात्र आयुक्तांच्या कारभारावर पुर्ण विश्वास असुन संघटना त्याचे समर्थन करीत आहे.