शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

उमपा विशेष समित्यांवर भाजप-ओमी टीमचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकासला भाजपने चितपट केले. एकूण ९ विशेष समिती सभापतीपदापैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिका विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकासला भाजपने चितपट केले. एकूण ९ विशेष समिती सभापतीपदापैकी शिवसेना एक व मित्र पक्ष असलेल्या रिपाइं गटातील पीआरपी पक्षाला एक असे दोन समिती सभापती पदावर समाधान मानावे लागले.

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना शिवसेना आघाडीने भाजपातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांच्या मदतीने महापौर, उप-महापौर पदांसह स्थायी समिती सभापतीपद पटकावले, तसेच प्रभाग समिती सभापती निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यानंतर विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना आघाडी पुन्हा भाजपला चितपट करेल, असे वातावरण निर्माण झाले होते; परंतु भाजपने पक्षातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांसोबत मिळतेजुळते घेऊन ९ पैकी ३ समिती सभापतीपदे पदरात पाडून घेतली, तर ओमी टीमकडे ४ महत्त्वाचे सभापतीपदे गेली. शिवसेना व मित्र पक्षाच्या वाटेला प्रत्येकी एक असे दोन सभापती पदे मिळाली. ९ पैकी ७ समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. क्रीडा व पाणी पुरवठा समिती सभापती पदासाठी भाजप-शिवसेना आमनेसामने उभी ठाकले; मात्र पराभवाच्या भीतीने निवडणुकीच्या काही मिनिटांपूर्वी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे दोन्ही उमेदवार सभापतीपदी निवडून आले.

यात सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी डिंपल ठाकूर, नियोजन व विकास समिती सभापतीपदी दीपा पंजाबी, पाणी पुरवठा समिती सभापती अजित गुप्ता, आरोग्य समिती सभापतीपदी शंकर लुंड, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी गीता साधवाणी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ज्योती पाटील, महसूल समिती सभापतीपदी कविता गायकवाड असे ९ पैकी ७ समित्या भाजप व पक्षातील बंडखोर ओमी टीमकडे गेल्या. तर शिवसेनेच्या शुभांगी बेहनवाल यांच्याकडे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती सभापतीपद तसेच रिपाइंतील पीआरपी गटाचे प्रमोद टाले यांच्याकडे गलिच्छ नागरी समिती सभापतीपद गेले आहे.

- ओमी कलानी टीम नेमकी कुणाकडे?

विधानसभा उमेदवारी कलानी कुटुंबाला दिली नसल्याच्या निषेधार्थ भाजपातील ओमी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजप उमेदवाराऐवजी शिवसेना-रिपाइंच्या लिलाबाई अशान व भगवान भालेराव याना मतदान करून महापौर-उपमहापौरपदी निवडून आणले. स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापतीपाठोपाठ प्रभाग समिती सभापतीपदी शिवसेना? आघाडीचे वर्चस्व पाहिले; मात्र विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने ओमी कलानी टीमसोबत जुळवून घेतल्याने त्यांना ९ पैकी ७ सभापतीपदे मिळाली. या निवडणुकीनंतर ओमी कलानी टीम नेमकी कुणाकडे भाजप की शिवसेना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.